spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

gram panchayat election result : संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं, तर धुळ्यात भाजपचं निर्विवाद यश

राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुकीसाठी (election) मतदान रविवारी पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज (Gram Panchayat Election Results 2022) होत असून अनेक भागातील निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुकीसाठी (election) मतदान रविवारी पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज (Gram Panchayat Election Results 2022) होत असून अनेक भागातील निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक झाले असून स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वराज संघटनेनं आपली चमक दाखवली आहे. नाशिकमधील ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Result) बिगुल वाजला असून इकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात भाजपने (BJP) निर्विवाद यश संपादित केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे (Grampanchayat Election) निकाल हाती आले असून ३३ पैकी ३२ जागांवर भाजपने कमळ फुलविले आहे. तर फक्त राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २,भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे. नाशिक तालुक्यात शिंदे गटाला खातं उघडता आलं नसलं तरी संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेने नाशिक तालुक्यात एका जागेवर खातं उघडलं आहे.

नाशिक – एकूण ग्रामपंचायत- १६
शिवसेना – २
शिंदे गट – ०
भाजप- १
राष्ट्रवादी- ३
काँग्रेस- १
स्वराज्य संघटना – ०१
इतर – ०

दरम्यान धुळे जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतीसाठी काल रविवार निवडणूक प्रक्रिया पार पडली. रिमझिम पावसात नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळपासुन मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरवात झाली. त्यानंतर हळूहळू कल येण्यास सुरवात झाली होती. यामध्ये भाजपने सुरवातीपासून आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर शेवटपर्यंत भाजपने सर्वच जागा जिंकून केवळ जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. तर इतर पक्षांना काढता पाय घ्यावा लागला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून यातील तब्बल ३२ जागांवर भाजपने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीच्या घड्याळाने मोहोर उमटवली आहे. तर शिवसेना, शिंदेगट व इतर पक्षाला भोपळाही फोडता आला असल्याचे चित्र आहे.

आज सकाळपासुन मतमोजणीचा सुरवात झाली. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक निकालाचा काल हाती आला. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींपैकी ३३ ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना, शिंदेसेना, काँग्रेस या पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.

दरम्यान, राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ६०८ ग्रामपंचायतींपैकी ५१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत ११२ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. भाजपने सर्वाधिक ५६ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने २९ जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाने १२ जागांवर बाजी मारली आहे. काँग्रेसने १२ जागा जिंकल्या आहे. तर शिवसेना ही चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. शिवसेनेनं आतापर्यंत ४ जागांवर बाजी मारली आहे.

हे ही वाचा:

पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंचांची निवड ; सत्तांतरानंतरचा पहिलाच गुलाल

नंदुरबारमध्ये भाजपचा धुरळा,शिंदे विरुद्ध लढतमध्ये भाजप आघाडी, ९ ग्रामपंचायतींवर कमळ फुलणार

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; शिंदे गटाला शिवसेनेपेक्षा अधिक जागा; जाणून घ्या निकालात कोणाची बाजी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss