spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री पदाच्या घोषणे नंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिकिया

एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच त्यांनी एक ट्विट ही केले आहे.

अखेर देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या दहा दिवसानंतर मुंबईत परतले आहेत. सर्वप्रथम त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि दोघे ही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेण्यासाठी राजभवनात पोहोचले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदें यांची नवे मुख्यंमत्री म्हणून घोषणा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच त्यांनी एक ट्विट ही केले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
“आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही “आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन पुढे जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

http://http://https://twitter.com/mieknathshinde/status/1542483786059116549?t=H_2D0s4Y1Y98DlDAML7wZA&s=03

एकनाथ शिंदे यांचे ट्विट
हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…तसेच स्वत:ची परवा न करता,हिदूत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी न घाबरता सत्तात्याग करून वेगळी भूमिका मांडण्याची धमक दखावणार्या माझ्या सहकारी आमदारांचे ही आभार. असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे ही आभार मानले आहेत.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात सामील होणार नाही, मी एकनाथ शिंदे यांना बहरवुन मदत करेन असे सांगितले आहे. थोड्याच वेळात राजभवनात राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत शपथ पार पडेल.

Latest Posts

Don't Miss