spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पवारांच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसीय दौरा

२२, २३ आणि २४ सप्टेंबर २०२२ असा तीन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर निर्मला सीतारमण येणार आहेत.

२०२४ मधील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. हल्लीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच्याही बारामती दौऱ्याची घोषणा आता करण्यात आली आहे. २०२४ च्या निवडणुकींच्या दृष्टीने भाजपने हा दौरा आयोजित केल्याचे म्हटले जात आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मतदारसंघ आहे. आता सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पिंजून काढणार आहेत.

२२, २३ आणि २४ सप्टेंबर २०२२ असा तीन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर निर्मला सीतारमण येणार आहेत. भाजपने बारामती लोकसभा मतदासंघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवली आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये निर्मला सीतारमण या खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत. या ठिकाणी विविध एकवीस कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमाचा शेवट पुणे इथे पत्रकार परिषदेने होणार आहे.

निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, “भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारी अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बारामती मतदारसंघाच्या प्रभारी बनवलं आहे. सीतारमण पुढील १८ महिन्यात ५ ते ६ वेळा बारामतीमध्ये येतील. आपल्या प्रत्येक दौऱ्यात तीन दिवस बारामतीमध्ये राहून २१ कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी सीतारमण या केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेणार आहेत. याशिवाय त्या समाजातील विविध समुदायातील नागरिकांची भेट घेणार आहेत.”

भाजप २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोत बैठक घेऊन आढावा घेत आहेत. २०१९ च्या ज्या १४४ लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, तसंच उमेदवार दोन किंवा तीन क्रमाकांवर होते, त्या जागांची सध्याची स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला जात आहे. निर्मला या पूर्वी अमित शहांचा मुंबई दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि तसेच टीकेचा विषय ठरला होता आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान निवडणुकांसंदर्भात अनेक राजकीय बैठका देखील घेतल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचा भाजपला नक्की काय फायदा होतो? आणि विरोधी पक्षांमधून याबाबतीत काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

हे ही वाचा:

हिंदी ‘बिग बॉस सिझन १६’ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

शिवसेनेचा आक्रमक इशारा, शिवतीर्थचा मुद्दा ताणल्यास थेट उतरणार मैदानात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss