spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Grampanchayat Election Result : सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कमळ, तर शिंदे गट व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नंदुरबारमध्ये भाजपने बाजी मारली आहे. नंदुरबारमध्ये झालेल्या ७५ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. तर शिवसेना (शिंदेगट) २८, अपक्ष ४ व राष्ट्रवादी १ आणि लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे. नंदुरबारमध्ये ७५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं होतं. त्या निवडणुकीचा आज निकाल लागला असून त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे, शिवसेनेने (शिंदेगट) २८ जागी सत्ता मिळवली आहे.

नंदुरबार तालुक्यातील आष्टा गावाची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. भाजपचे नेते आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी आमदार आणि शिंदे गट नेते चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र डॉ. गावित यांच्या गटाने आष्टीच्या निवडणुकीत बाजी मारली असून शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : 

Dasara Melava : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्टाईल मध्ये भाषण करणार का?, ठाकरे प्लॅन बी मोडवर

भाजपने विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती

देवपूर, नटावद, भवानीपाडा , अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धिरजगांव, नवागांव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगळू, मालपूर, लोय, निंबगांव, कोठली, पावला, शिवपूर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगांव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपुर या ग्रामपंचायतीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले.

Grampanchayat Election : आता फक्त भाजप आणि शिंदेंच्या सेनेचा झेंडा फडकणार, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

आत्तापर्यंत २६२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप १०१, शिंदे गट २४, शिवसेना १४, कॉंग्रेस २२, राष्ट्रवादी ५८ आणि अपक्षासहित अन्य पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले आहेत.

खा.संजय राऊतांचा गरबा तुरुंगातच, न्यायालयाच्या ‘या’ निर्णयनाने शिवसेनेला धक्का

Latest Posts

Don't Miss