spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केआरके पुन्हा चर्चेत; उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत केले खळबळजनक वक्तव्य

आपल्या ट्विटमध्ये केआरकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) (Rashtriya Swayamsevak Sangh) संघप्रमुखांना आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग केले आहे.

कायम वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खानने (Kamal Rashid Khan) सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक वादग्रस्त ट्विट केले आहे. तो आपल्या चित्रविचीत्र ट्विटसमुळे (Twitter) नेहमीच चर्चेत असतो आणि त्याने सध्या केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याने केलेले हे ट्विट खळबळजनक ठरले आहे कारण आपल्या ट्विटमध्ये केआरकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) (Rashtriya Swayamsevak Sangh) संघप्रमुखांना आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग केले आहे.

KRK ने आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) (Rashtriya Swayamsevak Sangh)संघप्रमुख मोहन भागवत आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत लिहिले आहे की, “आदरणीय मोहन भागवत जी, RSS ला माझी गरज भासल्यास मी संघात येण्यास तयार आहे.” काही दिवसांपूर्वीच त्याने एका ट्विटद्वारे सांगितले होते की, मी लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे.

त्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘मी लवकरच राजकीय पक्षाचा भाग बनण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नसून नेता बनणे आवश्यक आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांचे समर्थन केले. एका यूजरने लिहिले की, ‘ तुमच्या स्वतःचा पक्ष काढा , आम्ही तुमच्यासोबत आहोत.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘उशीर झाला आहे.’ याशिवाय अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त करत त्याला विचारले की तू खरंच अभिनेता आहेस का?

विशेष म्हणजे केआरकेला त्याच्या जुन्या ट्विटमुळे मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांने दिवंगत ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. अटकेनंतर त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच वेळी, त्याच्यावर २०२१ मध्ये वर्सोवा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याला नऊ दिवस कोठडीत ठेवल्यानंतर न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर आला.

हे ही वाचा:

दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं?, विरोधकांचा गंभीर आरोप

Dasara Melava : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्टाईल मध्ये भाषण करणार का?, ठाकरे प्लॅन बी मोडवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss