spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

SSC-HSE Exams : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, दहावी-बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेला सुरु होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर सध्या करण्यात आले आहे.माहितीनुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं?, विरोधकांचा गंभीर आरोप

येत्या काही दिवसातच राज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत वेबसाईडवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील काहीसा ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे.  अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

Grampanchayat Election Result : सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कमळ, तर शिंदे गट व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू

Latest Posts

Don't Miss