spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मासिक पाळीच्या वेदना टाळण्यासाठी करा घरगुती उपाय

काही जणांना मासिक पाळी वेळेवर येते किंवा काहीजणांना १ किंवा २ महिन्यानंतर येते . त्यामुळे आपण औषध उपचार करतो. मासिक पाळी आल्यास त्या वेदना सहन होत नाही. मासिक पाळी आल्यास खूप चिडचिड होते, मळमळ, डोकेदुखी, आणि उलट्या होतात. काहींना मासिक पाळीच्या दिवसात जास्त वेदना होतात. काही अशी कारणे आहेत त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना वाढतात. मासिक पाळी आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना होतात. तर चला आज आपण जाणून घेऊया मासिक पाळीच्या वेदना कमीकरण्यासाठी घरगुती उपाय.

घरगुती उपाय –

आपल्या पोटावर गरम हीटिंग पॅड ठेवल्याने स्नायू शिथिल झाल्याने पोट दुखणे कमी होते. उष्णता गर्भाशयाच्या स्नायूंना मदत करते, ज्यामुळे आपल्यला आराम मिळतो.

अर्धा किंवा एक चमचा दालचिनी पावडर दुधात मिसळून प्या. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत होईल.

मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे , पण यावेळी काही हलके व्यायाम खरोखर फायदेशीर ठरतील. आपण हलका व्यायाम करू शकता बॉडी स्ट्रेच करणं किंवा फिरायला जाऊ शकता किंवा थोडासा योगा करू शकता.

मासिकपाळीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या तिळाचे सेवन करू शकता.

तुळशीच्या पानांपासून रस बनवा आणि त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि ते पिया त्यामुळे तुमचा पोटातील वेदना कमी होतील.

मासिक पाळी आल्यास चिंच , खारट पदार्थ , दारू , हे पदार्थ खाणे टाळा .

भरपूर प्रमाणात गरम पाणी किंवा कोमट पाणी पिणे त्यामुळे मासिक पाळीचा वेदना कमी होतात.

जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉकटरांचा सल्ला घेणे.

पपईमध्ये कॅरोटीन असते, त्यामुळे पपईचा खाण्यामध्ये समावेश करा.

मासिकपाळी नियमित न आल्यास अधिक वेदना होतात त्यामुळे गरम पाण्यात ओवा चांगला उकळून घ्या त्यानंतर तो गाळून घ्या आणि मग मधात मिक्सकरून पिया त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येईल आणि वेदना देखील कमी होतील.

हेही वाचा : 

SSC-HSE Exams : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, दहावी-बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेला सुरु होणार

Latest Posts

Don't Miss