spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळावा वादात आता राऊतांची उडी, दिला मोलाचा सल्ला

एकनाथ शिंदे आणि ४० समर्थक आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळेच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा आणखीन मजबूत करण्यासाठी शिवाजीपार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

एकनाथ शिंदे आणि ४० समर्थक आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळेच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा आणखीन मजबूत करण्यासाठी शिवाजीपार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंही दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजीपार्कमध्ये मेळावा घेण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. बीकेसीमधील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला एमएमआरडीने परवानगी दिली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन अनेक चर्चा रंगत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. आणि या वादात आता आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.

सोमवारी दि . १९ सप्टेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये ३ ऑक्टोबरपर्यंत आता वाढ करण्यात आली. सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयामध्ये आलेल्या संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू विनायक राऊत आणि वकील होते. या व्यक्तीरिक्त न्यायालयामध्ये शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनीही संजय राऊतांची भेट घेतली. यावेळी बोलताना दसरा मेळाव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना संजय राऊतांकडून देण्यात आल्याचं समजतंय.

या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या विषयाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कामध्ये मेळावा घ्यावा” असा सल्ला दिला आहे.

दसरा मेळाव्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मैदान उपलब्ध व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी हेच मैदान मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हे ही वाचा:

ऊंदीरमामाच्या करामती, अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा बंद !

नवरात्री मध्ये गरब्याच पारंपरिक महत्व

डॉक्टर जी: लोकांना हसवण्यासाठी आयुष्मान खुराना झाला सज्ज; जाणून घ्या चित्रपटाबाबत नवी अपडेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss