spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India vs Australia 1st T20 : उमेश यादवने ‘या’ दोन खेळाडूंचे वाढवले टेन्शन

भारतीय खेळाडू व वेगवान गोलंदाज उमेश यादव ३ वर्षांनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. खेळाडू मोहम्मद शमी कोविड पॉझिटिव्ह आल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत उमेश यादवला बदली म्हणून संधी देण्यात आली आहे. उमेश यादवने संघात येताच दोन खेळाडूंचे टेन्शन वाढवले ​​आहे. या दोन्ही खेळाडूंना पहिल्या T20 सामन्यात खेळण्यास वगळण्यात येणार आहे.

टीम इंडियाची नवी ‘बिलियनच अर्स जर्सी’ लाँच

उमेश यादवने ‘या’ खेळाडूंचे टेन्शन वाढवले

उमेश यादव नुकताच कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी आला असून, या कामगिरीनंतर निवड समितीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा पहिल्या T20 मध्ये उमेश यादवला संधी देऊ शकतो. उमेश यादवचा प्लेइंग ११ मध्ये समावेश झाल्यास हर्षल पटेल आणि दीपक चहरला बाहेर बसावे लागू शकते. टीम इंडियाच्या संघात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचाही समावेश असून, ते कर्णधार रोहितची पहिली पसंती असणार आहेत.

हेही वाचा : 

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

दुखापतीनंतर संघात पुनरागमन

हर्षल पटेल आणि दीपक चहर हे दोघेही दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहेत. हर्षल पटेल देखील दुखापतीमुळे आशिया कप २०२२ चा भाग नव्हता, तर दीपक चहर आशिया चषकापूर्वी संघात परतला होता. हर्षल पटेल १० जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात तो जखमी झाला होता.

उमेश यादव यांची क्रिकेट कारकीर्द

उमेश यादव टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने भारतासाठी ५२ कसोटी सामन्यात १५८ विकेट्स, ७५ एकदिवसीय सामन्यात १०६ बळी आणि ७ टी-20 सामन्यात ९ बळी घेतले आहेत. तो कसोटी संघात टीम इंडियाचा भाग आहे, परंतु टी-20 आणि एकदिवसीय संघात त्याला स्थान मिळवता आलेले नाही. उमेश यादवने त्याचा शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला.

डॉक्टर जी: लोकांना हसवण्यासाठी आयुष्मान खुराना झाला सज्ज; जाणून घ्या चित्रपटाबाबत नवी अपडेट

Latest Posts

Don't Miss