spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा’…

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे होत आहेत. एकीकडे पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Case) आता मोठा ट्विस्ट आला आहे. ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं आता पत्राचाळ घोटाळ्यात कोणत्या माजी मुख्यमंत्र्याचा हात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे होत आहेत. एकीकडे पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Case) आता मोठा ट्विस्ट आला आहे. ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं आता पत्राचाळ घोटाळ्यात कोणत्या माजी मुख्यमंत्र्याचा हात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. ईडीनं (ED) आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर आता दुसरीकडे ईडीने आरोप पत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच त्यांनी एक ट्वीट देखील केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रादवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे. One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळ घोटाळ्याप्रकारणी ईडीचा मोठा खुलासा, माजी मुख्यमंत्र्यांचा हात?

National Punch Day: जाणून घ्या अमेरिकेत प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय पेयाची कहाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss