spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुणकारी मुळ्याचे आरोग्यासाठी फायदे

आता हिवाळा सुरु होईल हिवाळामध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या येतील. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते. त्याचप्रमाणे मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. काही लोकांना कच्चा मुळा खायाला आवडत नाही तर तुम्ही मुळ्यापासून मुळेची भाजी बनू शकतो. किंवा त्याच्यापासून चटणी बनू शकतो.

हे ही वाचा : महागाई विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

 

मुळा खाण्याचे फायदे –

वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर मुळा त्यावर उत्तम उपाय आहे. मुळात मुळ्याची कोशिंबीर तुम्ही पोळीसह खाल्ल्यास तुम्हाला योग्य फायबर मिळते आणि पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि तुम्ही डाएट करत असाल तर त्यामध्ये मुळ्याचा नक्की समावेश करून घ्या. याने कॅलरी कमी होण्यासही मदत मिळते.

मुळ्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण असते जे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करते. विटामिन सी त्वचेवरील कोलेजन वाढवून त्वचेवर चमक आणण्याचे काम करते. त्यामुळे मुळ्याचा उपयोग तुम्हाला त्वचेसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

जर तुम्हाला पोटाशी निगडित समस्या असतील तर तुम्ही मुळ्याचा समावेश करा. मुळा खाल्याने पचन क्रिया सुधारते आणि पोट दुखी वगरे होत नाही.

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुळा खूप उपयुक्त आहे. मुळा खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

मुळा खाल्याने कावीळ सारखा आजार बारा होतो.

रोज थोडा मुळा खाल्ला तर तुम्हाला असणारा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल. आतडी साफ करण्यासाठी फायबरमुळे फायदा होतो. म्हणूनच मुळा खाण्याचा फायदा बद्धकोष्ठावर गुणकारी ठरतो.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मुळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी मुळा हे उत्तम औषध आहे. मुळा मध्ये कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

हे ही वाचा : 

Mahesh Bhatt : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचे गाजलेले वाद

 

Latest Posts

Don't Miss