spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raju Shrivastav : शेवटच्या व्हिडिओमधून हसून गेले राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे सर्वांना धक्का बसला

राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे सर्वांना धक्का बसला. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका झाला आणि त्यांना ताबडतोब एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यापासूनच त्यांची मृत्यूशी झुंज चालू होती.

हे ही वाचा : Raju Srivastava : विनोदाचा बादशहा हरपला, राजू श्रीवास्तवबद्दल काही खास किस्से…

 

जेव्हा जेव्हा राजू श्रीवास्तव कॅमेऱ्यासमोर आले तेव्हा ते प्रेक्षकांना हसवायचे. जातांना देखील त्यांनी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य सोडून गेले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या अगोदर त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडियोमध्ये त्यांनी लोकांना मजेशीरपणे कोरोनाविषयी खबरदारी दिली आहे. अजूनही कोरोना गेला नाही. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विनोद खन्ना यांच्या आवाजातील कॉलर ट्यून आणि वेगेवगेळ्या अभिनेत्याच्या आवाजात कॉलर ट्यून बोलून दाखवली आहे. इतर व्हिडिओपेक्षा त्यांचा हा व्हिडिओ देखील मनोरंजक आहे.

 या व्हिडिओमध्ये त्यांनी करोनविषयी खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला असून त्यांनी पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर रिलीज केला आहे. राजू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी त्यांच्या प्रकृती विषयी प्रार्थना केली होती. मात्र गेले ४० दिवस मृत्यूशी झुंच सुरु होती आणि ती झुंच २१ सप्टेंबर रोजी संपली. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वातील एक स्टॅंडप कॉमेडी मधला आवाज हरपला.

कानपुर शहरातून आलेल्या राजू यांनी आपले मनोरंजन विश्वात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. आणि त्यांचा सर्वांना आदार आहे. राजू श्रीवास्तव यांना लहानपानपासूनच कॉमेडियन बनण्याचे स्वप्न होते. तसेच त्यांनी बॉलीवूड सिनेमात छोट्या पडद्यावर छोटे – मोठे काम केले आहे. पण त्यांची खरी ओळख “द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ने.”या शो मधून दिसून आली. त्या शोमधील अजून ही व्हिडिओ प्रेक्षकांना आवडतात. तसेच त्यांनी बिग बॉस या शो मध्ये देखील आपली झलक दाखवली आहे.

हे ही वाचा :

Raju Shrivastava : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

 

Latest Posts

Don't Miss