spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut : संजय राऊतांना जामीनाच्या सुनावणीला झाला उशीर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रचाल घोटाळ्या प्रकरणात (ईडी) सक्तवसुली संकलकाकडून अटक करण्यात अली. आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्टबाबत) कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु वाहतूक कोंडीमुळे राऊत यांना कोर्टात पोहचायला उशिर जाळायचे समोर येत आहे. संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जवळजवळ दीड तास उशिराने हजर करण्यात आले. पण, यापूर्वीच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं होतं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील आरोपी प्रविण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतरच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत काल (१९ सप्टेंबर)ला एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढवली. आता संजय राऊतांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी प्रुमख्याने पत्रचाल घोटाळ्याचा मुदा धरून ठेवला होता. अनेक वेळा त्यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचा या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं. १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला आहे.

हे ही वाचा:

आज एकाचवेळी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री बोलणार

ICC ने क्रिकेटचे नवीन नियम जाहीर, नवीन नियम या दिवसा पासून लागू होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss