spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Apple iPhone 14 Pro Max फोनमध्ये आढळल्या त्रुटी

Apple iPhone 14 Pro Max :  iPhone 14 Pro Max लाँच झाला आहे. पण त्याच्या कॅमेऱ्यात एक त्रुटी दिसली आहे. ज्याबद्दल अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. या फोनच्या व्हिडीओ कॉलिंग दरम्यान युजर्सना समस्या येत आहेत.

Apple iPhone 14 Pro Max :  iPhone 14 Pro Max लाँच झाला आहे. पण त्याच्या कॅमेऱ्यात एक त्रुटी दिसली आहे. ज्याबद्दल अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. या फोनच्या व्हिडीओ कॉलिंग दरम्यान युजर्सना समस्या येत आहेत.

युजर्सना फक्त iPhone 14 Pro Max च्या मॉडेलमध्ये समस्या येत आहे, ज्याबद्दल Apple ने पुष्टी केली आहे की पुढील आठवड्यापर्यंत ही समस्या सोडवली जाईल. Apple iPhone 14 Pro आणि 14 Pro Max हे देशातील सर्वात महागडे स्मार्टफोन आहेत. iPhone 14 Pro ला 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे, तर iPhone 14 Pro Max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 nits आहे, जी अजून कोणत्याही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाही. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये A16 Bionic चिपसेटचा पर्याय आहे. आयफोन 14 सीरीजच्या इतर मॉडेल्सप्रमाणे, प्रो मॉडेल नव्या iOS 16 वर देखील कार्य करतील. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहे. फोनचा प्राथमिक म्हणजेच मुख्य कॅमेरा 48MP आहे, ज्यामध्ये क्वाड पिक्सेल सेन्सर वापरण्यात आला आहे. याशिवाय 12MP अल्ट्रा वाईड अँगल आणि 12MP तिसरा कॅमेरा फोनमध्ये उपलब्ध आहे.

Apple च्या फोनमध्ये एक बग सापडला आहे, ज्यामुळे iPhone 14 Pro Max चा कॅमेरा अस्पष्ट आणि खराब दर्जाचा व्हिडीओ शूट करत आहे. MacRumors ला दिलेल्या निवेदनात ऍपलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ‘अनेक लोकांना इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक सारख्या इन अॅप्सचा कॅमेरा वापरताना कॅमेरा त्रुटी जाणवत आहेत. काही युजर्सनी iPhone 14 Pro Max मध्ये थर्ड पार्टी अँप्सच्या कॅमेऱ्यातून व्हिडीओ रेकॉर्ड केल्यावर व्हिडीओची स्मूद क्वॉलिटी दिसली नाही. त्याचबरोबर काहींच्या कॅमेऱ्यातून कॅमेरा मोड बदलूनही अस्पष्ट आणि निकृष्ट दर्जाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होत आहे. या समस्येबाबत Apple ने पुष्टी केली आहे की पुढील आठवड्यापर्यंत ही समस्या दूर होईल.

हे ही वाचा:

शेतकरी आणि अग्नीवीर आंदोलनात नक्षलवाद्यांचा हात

धारावीतील रखडलेल्या पुनर्विकासाबाबत मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss