spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray : सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचा पहिलाच मेळावा; भाजपवर केला जोरदार हल्लाबोल

मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (Shivsena) मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात हा मेळावा होत आहे.

आज या मैदानात अनेक शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या आहेत. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी गिधाडांना लचका तोडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईवर गिधाडे घिरट्ये घालत आहेत. हे काय नवीन नाही. मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून मोठे झालो आहोत. स्वराज्यावर ज्यांनी चाल केली त्यांना धडा शिकवला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आले आहेत. आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू. तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हांला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच व्यासपीठावर संजय राऊत यांची खुर्ची हि रिकामी आहे आणि त्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले आहेत कि राऊत मोडेन पण वाकणार नाही.

ज्या शिवसेनेने मोठे केले, मोठमोठी पदे दिली. येताना रस्त्यावरचे फलक पाहत होतो. त्यांचे फलक किती लांबवर लावले आहेत. ढोकळा खायला फार लांब जावं लागलं. आज मी मुंबईवर बोलणार आहे. कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय, मला त्यावर बोलायचं आहे. कमळाबाई हे नाव शिवसेनेनं दिलं आहे. मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करु नका. आज मी फक्त मुंबईबद्दल बोलणार आहे आणि मुळात मुंबईबद्दल बोलताना कमळाबाईचं आणि मुंबईचा संबंध काय असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे. परंतु मुबंई आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा सांगतो, जे आज सगळ्यांना पटलं असेल युतीमध्ये शिवसेना सडली हे तुम्हाला पटते की नाही? आजपर्यत नालायक माणसं आपण पोसली, काय होतं तुमचं कर्तृत्व, वरती काय गेलात तर आम्हाला लाथा मारायला लागलात, अरे दरवेळी वंशावळीवर काय बोलता, मला माझ्या आजोबांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तुम्ही एवढे बाहेरचे उपरे घेतले आहे की, वाबनकुळे की एकशे वाबनकुळे, मला कशाला बोलायला लावता असे देखील उद्धव ठाकरे म्हणले आहेत.

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील घडामोडी तुम्हाला माहित हव्यात. जनसंघ हा समिती फोडणारा, ही त्यांचीच औलाद आहे. पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळालं… मेहनत करायची शिवसैनिकांनी. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे… तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत… वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला आहे.

आता काल परवा चित्ता आणला, चित्ता काय बोलत नाही, चित्ता आणला चांगली गोष्ट आहे. मात्र मी माझ्या लोकांसाठी काय करतो हे जास्त महत्वाचे आहे. आम्हीही पेग्विन आणले होते. मी तर स्वतः फोटोग्राफर, मात्र फोटो काढायला विसरलो. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

माझं आव्हान आहे की, संपूर्ण देशात महाराष्ट्रात जे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले ते कुणीही केले नाही. कोरोनाच्या परिस्थितीत जे काम केले ते कौतूकास्पद होते. कोरोनाला केंद्राची अनास्था जबाबदार असल्याचा एक अहवाल समोर आला आहे. पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष…कारण माझ्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे. असं म्हणत शिंदे गटाला चिमटा काढला आहे. सरकार येण्याआधी कोणत्या पंढरीच्या वारीला कोणी परवानगी दिली होती.

मुंबई तुम्हाला कधी कळली का, त्याच आणि मुंबईचे घट्ट नाते माहिती आहे, आमच्या शाखा नेहमीच उघड्या असतात. त्या शाखांमध्ये माझा शिवसैनिक, गटप्रमुख हे अहोरात्र काम करत असतात. माझे चॅलेज आहे मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर् एवढी मोठी गर्दी जमवून दाखवावी यांना बदल करायचा आहे. आमचं ठरलय. अरे काय ठरलय. यांना मुंबई बुडवून टाकायची आहे. आम्ही जी कामं केली आहेत ती तुमच्यासमोर आहेत. जे बोलतो ते करतो. गेल्या पालिकेच्या निवडूकीच्यावेळी जो वचननामा दिला होता तो पूर्ण केला आहे. मुंबई पालिकांच्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून गर्दी आहे याचा अभिमान आहे. मला अरविंद केजरीवाल यांचे कौतूक वाटते.

तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, नोकऱ्या चालल्या आहेत, वेदांत गेला त्याच्याबद्दल धांदात खोटे बोलत आहेत. तो प्रकल्प पुन्हा आणा. एकेक उद्योग निघून जात आहेत. मिंधे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही. सांगा की पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला, म्हणजे हे अगोदरच ठरले होते. आम्ही तुमच्या सोबत आहे , आणा प्रकल्प परत असे देखील उद्धव ठाकरे यावेळेस म्हणले आहेत. महापालिका जिंकण्यासाठी हा विषय नाही. शिवसेना ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी काम करते आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरी गेली आहे. प्रत्येकवेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो.

फडणवीस ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील पहिली निवडणूक आहे असं लढणार आहोत. आशा ताईंच्या गाण्याचा संदर्भ ठाकरे यांनी यावेळी दिला. आशाताई तुमची गाणी लोकप्रिय होतात त्याचे रहस्य काय, आशाताई म्हणाल्या, आजही माझ्याडोळ्यासमोर माझे पहिले गाणे येते…तसेच आपणही जे गेले ते गेले. त्यांचा विचार करायचा नाही. तुम्ही सगळे कामाला लागा. प्रत्येक शिवसेनेची शाखा उघडी आणि त्यात गटप्रमुख दिसलेच पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना देखील आवाहन केले आहे कि, हिंदूमध्ये फूट पाडू नका, अमित शहांना आवाहन देतो आहे, हिंमत असेल तर मुंबई पालिका एका महिन्यात घेऊन दाखवा, त्यातच विधानसभा घेऊन दाखवा. कुस्ती आम्हालाही येते. बघुया कोण कुणाच्या पाठीला माती लावतं ते. ज्यांनी इमान विकलं आहे ती बेईमान माणसं किती वेळ माझ्यासोबत राहतील. जा निघून जा. गेट आऊट…

 

 

Latest Posts

Don't Miss