spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय महिला संघाचा इंग्लंड विरुद्ध दणदणीत विजय

पहिल्या सामन्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसरा सामन्यांमध्ये सुद्धा दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी केली. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला. २३ वर्षानंतर महिलांच्या संघाने इंग्लंडमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभव केला. काल बुधवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिका देखील जिंकली.

भारतीय महिला क्रिकेट संघ सलग दोन वर्ष इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे . गेल्यावर्षी झालेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला होता. यावेळी मात्र महिला संघाने बाजी पलटली आणि मालिकेतील पहिल्या दोन लढती जिंकून कमाल केली. दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३३३ धावांचा डोंगर उभा केला होता. उत्तरादाखल इंग्लंडला सर्वबाद २४५ धावा करता आल्या. भारताकडून हरमनप्रीत कौरने १११ चेंडूत नाबाद १४३ धावा केल्या, यात ४ षटकार आणि १८ चौकारांचा समावेश होता. तिने १२८.८३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. हरमनचे हे वनडेमधील पाचवे शतक ठरले.

शहानंतर, मोदींचीही भेट होण्याची शक्यता

इंग्लंडविरुद्ध स्मृती मानधनाने ४० धावांची खेळी केली. यासह स्मृती महिला वनडेमध्ये सर्वांत वेगवान तीन हजार धावांचा टप्पा पार करणारी भारताची फलंदाज ठरली. तिने ७६ डावांत हा टप्पा पार केला. याबाबतीत तिने मिताली राजला मागे टाकले. या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमधील ३ हजार धावांचा टप्पा पार केला.

 हे ही वाचा:

Blue Aadhaar Card : ब्लू आधार कार्ड म्हणजे काय ? आणि ते कसे बनवायचे …?

PFIच्या कार्यालयावर NIAची छापेमारी सुरूच : तब्बल 20 संशयित ताब्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss