spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा ‘Double xl’ चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Double xl या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात महिलांच्या शरीराच्या वजनाविषयी गोष्टींचा शोध घेणारा एक स्लाईस-ऑफ-लाइफ कॉमेडी-ड्रामा आहे, या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. महिल्यांच्या वजनामुळे त्यांना ट्रोल केलं जात. आणि त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांना त्यांचा वजनामुळे ट्रोल करण्यात आले आहे. आणि आता त्यादोघी Double xl या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना जागरूक करणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या दोघी महिल्यांचा आत्मविश्वास वाढवणार आहे.

 

Double xl या चित्रपटाचा नुकताच टिझर रिलीज झाला आहे. या टिझर मध्ये महिल्यांच्या तब्येतीविषयी आणि त्यांची स्वप्ने या बद्दल सांगण्यात आले आहे. या चित्रपटामुळे नक्की महिल्यांचा आत्मविश्वास वाढणार असे दिसून येते. आणि महिलांना त्यांचा तब्येतीविषयी वाईट वाटणार नाही आणि बिनदास पणे त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील असा आत्मविश्वास वावरता येईल. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे आणि यावर प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे असे देखील दिसून येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)

 हा व्हिडिओ प्रचंड वायरल होत असताना चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे असे सांगितले आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. आणि आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे सोनाक्षी सीना आणि हुमा कुरेशी यांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सूक आहेत आणि व्हिडिओ वर कंमेन्ट करत त्यांना चांगला प्रतिसाद देत आहे. या चित्रपटाचे सतराम रमाणी दिग्दर्शित आहेत. आणि या चित्रपटामध्ये खूप मस्ती, महिलांची स्वप्ने , महिलांची आव्हाने या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : भारतीय महिला संघाचा इंग्लंड विरुद्ध दणदणीत विजय

 

हे ही वाचा : Thunivu: अजितच्या AK61 चे शीर्षक आणि फर्स्ट लूक पोस्टर झाले रिलीज!

Latest Posts

Don't Miss