spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dasara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुहूर्त मिळेना, हायकोर्टाची सुनावणी लांबणीवर

दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे २२ ऑगस्टला शिवनेने अर्ज केला होता. मात्र, पालिकेने परवानगी नाकारल्यामुळे आता शिवसेनेचे कोंडी झाली आहे. यातूनही मार्ग काढण्यासाठी आता शिवसेनेनं अखेर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘अर्ज केल्यानंतर ७२ तासांत परवानगी अपेक्षित असताना, पालिकेने एक महिना होऊनही परवानगी दिलेली नाही. परिणामी आम्हाला न्यायालयात येणे भाग पडले आहे’, अशी कैफियत मांडत तत्काळ परवानगी देण्याचा आदेश पालिकेला देण्याची विनंती शिवसेनेने याचिकेत केली आहे. याबाबत न्या. रमेश धनुका व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर आज, गुरुवारी सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 

दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार – किशोरी पेढणेकर

आज झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. तर शिवसेनातर्फे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी युक्तिवाद केला. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठ्ये यांची बाजू मांडली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने आपल्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याच्या याचिकेवरील सुनावणी आज दुपारी अडीच वाजेपर्यंत पुढे ढकलली असल्याची प्रथम माहिती समोर आली होती.

दरम्यान, आता शिवसेनेच्या या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा परवानगीबाबत उद्या दुपारी १२ नंतर सुनावणी होणार आहे. वकिलांच्या विनंतीवरुन आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Nagpur News : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी नागपूर पोलीस आयुक्तांच्या सूचना, प्रेक्षकांनी कारचा प्रवास टाळावा

Latest Posts

Don't Miss