spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनन्या पांडे यांनी एकाच वेळी दोन मुलांना केले डेट, भावना पांडेंचं स्पष्टीकरण

कॉफी विथ करण ७ व्या सिजनच्या भागात करण यांनी असे सांगितले की अनन्या पांडे हिने एकाच वेळी दोन मुलांना डेट केले आहे. आणि तिच्या पाठराखण करण्यासाठी तिची आई भावना पांडे ह्यांनी स्पष्टीकरण दिले. अनन्या पांडे हिने काही महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर अभिनेता ईशान खट्टर याचा सोबत तिने ब्रेकअप केला.

हे ही वाचा : सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा ‘Double xl’ चित्रपट या दिवशी होणार रिलीज

 

रॅपिड – फाउंड राउंड च्या दरम्यान करणे गौरीला तिच्या मुलीबद्दल सुहाना खानच्या डेटिंग बद्दल विचारले होते. त्यावेळी तिने असे स्पष्टीकरण दिले की एकाच वेळी दोन मुलांना डेटिंग करू नका. असे कधीच करू नये. त्यानंतर करण भावना पांडे हिचा कडे वळला आणि तिला विचारले की तुझी मुलगी अनन्याने हे आधीच केले आहे. आणि आश्चर्यचकित होऊन भावना म्हणाली की हे तिने केले आहे का? त्यानंतर भावना ने मुलीच्या बचावासाठी असे उत्तर दिले की नाही ती दोघांचा विचार करत होती. पण तिने एकाशी ब्रेकअप केला. यामुळे सर्वांचे हसे झाले. अनन्या ईशानखट्टर सोबत डेट करत आहे अशा बातम्या येत होत्या. पण त्याचे नुकतेच ब्रेकअप झाले.

करणने अनन्याला विचारले की ती कार्तिक आर्यनला डेट करत आहे का आणि तिने उत्तर दिले की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. करणने अनन्यालाही आदित्य रॉय कपूरला ‘खूप हॉट’ वाटत आहे असे सांगायला लावले.

 

कॉफी विथ करणमध्ये अनन्या पांडे आली तेव्हा तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. त्यावेळी करणने अनन्याला विचारले होते की, इशानला डेट करताना तू विजयसोबतही डेटला गेली होती का? यावर अनन्याने उत्तर दिले, ती मैत्रीपूर्ण डेट होती. त्याचवेळी, अनन्याच्या बोलण्यातून समजले की ती अनन्याला शाहरुख खानचा मुलगा आर्यन देखील आवडतो.

अनन्या शेवटची विजय देवरकोंडा आणि बाकीचे कलाकार लिगर मध्ये दिसली होती. ती या पुढे ‘खो गये हम कहाँ’ मध्ये दिसणार आहे. त्यात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव देखील मुख्य भूमिकेत आहेत.

हे ही वाचा : 

‘दिल्लीत ‘रात्रीस खेळ चाले… ?’

 

Latest Posts

Don't Miss