spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार – अनिल परब

शिवसेना आणि शिंदे गटा मध्ये अनेक दिवसांपासून दसऱ्या मेळाव्या साठी रस्सीखेच सुरु आहे. आणि याच संधर्बात आज अनिल परब यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) मेळावा घेण्यास आम्हाला आडकाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला आतापर्यंत सात वेळा हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. आताही हायकोर्ट पुन्हा परवानगी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दापोली रिसॉर्टशी माझा संबंध नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व चौकशी झाली आहे. कोर्ट आदेश देईल ते बंधनकारक आहे. आम्ही किरीट सोमय्याला बंधनकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. सदानंद कदम हे त्या रिसॉर्टचे मालक असून तेच याबाबत बोलतील असे सांगत आमच्या बदनामीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे परब यांनी सांगितले.

आज अनिल परब माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सध्या सुरू असलेला प्रकार हा दसरा मेळाव्याला अपशकून करण्याची वृत्ती आहे. वर्ष १९६६ पासून दसरा मेळावा होत आहे. आता यामध्ये आडकाठी केली जात आहे. दसरा मेळाव्यासाठी विविध प्रकरणात आम्हाला सातवेळा हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. आम्हाला दसरा मेळाव्यासाठी कोर्टातून परवानगी मिळेल, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगत शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे. त्यावरही परब यांनी टीका केली. संघर्षाच्या ठिणग्या फक्त दादरमध्ये झडतात का असा सवाल त्यांनी केला. वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचा मेळावा आहे. मग, त्याच वांद्रेत मातोश्रीदेखील आहे असे सांगत परब यांनी महापालिकेच्या निर्णयाच्या विसंगतीवर बोट ठेवले.

हे ही वाचा:

Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी प्रयत्न केला ? राणेंचा सवाल

अनन्या पांडे यांनी एकाच वेळी दोन मुलांना केले डेट, भावना पांडेंचं स्पष्टीकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss