spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तेलकट चेहऱ्यापासून सुटका हवीय? तर करा हे घरगुती उपाय

अनेक जण तेलकट चेहऱ्याला खूप त्रासले आहेत. त्वचेच्या समस्या तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना जास्त असतात. तेलकट त्वचा असल्यामुळे लोक वेगवेगळे प्रॉडक्टस वापरतात. पण त्याच्या अतिवापरामुळे त्वचा खराब होते. तेलकट त्वचेमध्ये तुमच्या चेहऱ्यावर सतत थोड्या वेळाने तेल जमा होत राहतं आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला त्रास होतो. आपल्याकडे ऋतू बदलांमुळे बऱ्याचदा त्वचेवर परिणाम होत असतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात वातावरणामध्ये दमपटपणा येतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अधिक तेलकटपणा दिसू लागतो. तसेच हिवाळ्यामध्ये तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा आणि पोषण कमी प्रमाणात होते, हा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुमची त्वचा अधिक प्रमाणात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अशावेळी घरगुती उपाय केल्यास त्वचा देखील सुंदर होते. आणि त्वचेवरील समस्या देखील दूर होतात.

हे ही वाचा : सणासुदी मध्ये पैशाची बचत कशी कराल

 

घरगुती उपाय –

त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळा. कारण आपण तेलकट पदार्थ खाल्ले की आपले शरीर सुद्धा तेलकट होते. त्यामुळे तेलकट पदार्थ खाणे टाळा.

दिवसातून २ वेळा चेहरा थंड पाण्याने धुवा. तसेच तुमच्या चेहऱ्याला जो साबण सूट होईल तोच वापरा.

मधामध्ये अँटीसेप्टीकल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे तुमच्या तेलकट त्वचेसाठी हे उपयुक्त ठरतं. मध लावल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवरील ओलावा तसाच टिकून राहतो.

 

त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही ओट्सचा देखील वापर करू शकता. ओट्स त्वचेवरील तेल शोषून घेतो.

त्वचेवरील तेलकटपणा जाण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा देखील वापर करू शकता. कारण टोमॅटो मध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते आणि ते त्वचेतील तेलकटपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे.

तुम्ही तेलकट त्वचेसाठी फेसवॉशचा देखील वापर करू शकता.

तसेच कोरफडीचा गर आठवड्यातून एकदातरी त्वचेवर लावा. त्यामुळे त्वचेवरील तेल कमी होते.

हे ही वाचा : Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण पवारांच्या बालेकिल्ल्यात

 

Latest Posts

Don't Miss