Tuesday, September 24, 2024

Latest Posts

“मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला…”, मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

सध्या राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये रस्सीघेच सुरु आहे. आधी शिवसेना कोणाची हा प्रश्न असतानाच आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कोण घेणार यावरून वाद सुरु आहेत.

सध्या राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये रस्सीघेच सुरु आहे. आधी शिवसेना कोणाची हा प्रश्न असतानाच आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कोण घेणार यावरून वाद सुरु आहेत. तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण हे दिसून येत आहे. तसेच राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसत असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध मनसे असे वातावरण देखील दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट करत शिवसेनला खोचक टोला लगावला आहे.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, “आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाणे मनपात सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला”, अशी आठवण गजानन काळेंनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे. “मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू”, असं या ट्वीटमध्ये शेवटी गजानन काळेंनी म्हटल आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर तोंडसुख घेताना मनसेलाही खोचक टोला लगावला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत खोचक शब्दांत टोला लगावला होता. त्यावरून आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं असून उद्धव ठाकरेंना थेट ‘मामू’ अर्थात या चित्रपटातील बोमन इराणी यांच्या पात्राची उपमा दिली आहे.

हे ही वाचा:

… ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत; राज ठाकरेंनी सोशलमिडियाद्वारे केला संताप व्यक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss