Wednesday, September 25, 2024

Latest Posts

बोगस जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ

नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या वडिलांनाही वॉरंट बजावण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरातील हे दुसरे वॉरंट आहे.

कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवनीत राणा यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याने त्यांना अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) बजावला आहे. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या वडिलांनाही वॉरंट बजावण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरातील हे दुसरे वॉरंट आहे.

नवनीत राणा यांचा मतदारसंघ असुसूचित जातीसाठी राखीव होता. आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करत नवनीत राणा यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली.

शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये फेरफार करुन राणा यांनी हे बोगस जात प्रमाणपत्र मिळवल्याचे आढळले. यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंग राम सिंग कुंडलेस या दोघांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गेल्या महिनाभरात हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याआधीही राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश गेल्या वर्षी दिला होता. या आदेशाविरोधात नवनीत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

हे ही वाचा:

श्रीकांत शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार

मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच आवाज घुमणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss