Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच आवाज घुमणार

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सत्तासंघर्ष हा पाहायला मिळत होता. आधी शिवसेना या पक्षावरून हा सत्तासंघर्ष सुरु होता आणि नंतर दसरा मेळवावरून वाद सुरु झाले. अखेर दसरा मेळावा शिवतीर्थावर कोण घेणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट (Thackeray group) विरुद्ध शिंदे गट (Shinde group) असा सत्तासंघर्ष हा पाहायला मिळत होता. आधी शिवसेना (Shivsena) या पक्षावरून हा सत्तासंघर्ष सुरु होता आणि नंतर दसरा मेळवावरून (Dasara Melava) वाद सुरु झाले. अखेर दसरा मेळावा शिवतीर्थावर कोण घेणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.

यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena chief Uddhav Thackeray) यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेची पक्ष म्हणून परवानगी मागत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला दणका देत आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली. त्यामुळे शिवसेनेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

 शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा कोण घेणार? यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाकडून आपापली बाजू मांडण्यात आली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. यावेळी मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. २ ते ६ ऑक्टोंबरपर्यंत ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे.

अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य असल्याचे हाटकोर्टाने म्हटलं आहे. मात्र, पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचेही कोर्टाने म्हटलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्ष सुरु आहे. सरकारकडून शिवाजी पार्कवर ४५ दिवस कार्यक्रमासाठी राखून ठेवलं आहेत. असही हाय कोर्टाने आपल्या निकालात नमूद केलं आहे. तसेच, आमच्या मते पालिकेनं अधिकाराचा गैरवापर केला आहे आहे. अशा शब्दात हायकोर्टाने पालिकेला सुनावलं आहे.

सदा सरवणकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. तर ठाकरे गटाच्या युक्तिवादाशी हायकोर्ट सहमत असल्याचे म्हटले आहे. खरी शिवसेना कोणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाच हा मुद्दा आजचा नाही. असेही कोर्टाने निकाल वाचण्यापूर्वी यावेळी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

सदा सरवणकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Dasara Melava : हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारनंतर पुन्हा सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss