Tuesday, September 24, 2024

Latest Posts

बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? हायकोर्टाने केला शिंदे गटाला सवाल

हायकोर्टानं शिंदे गटाच्या वकिलांना तुम्ही इतर कोणत्या मैदानावर परवानगी मागितली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यंदा शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा सामना चांगलाच रंगलाय. दसरा मेळव्यावरून दोन्ही गटांमध्ये वातावरण चांगलाच तापलय आणि त्यात दसरा मेळ्यावा शिवजी पार्कमध्ये कोण घेणार? याचा वाद हायकोर्टात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीमार्फत तिन्ही बाजू हायकोर्टानं ऐकून घेतल्या आहेत. तुम्हाला बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न यावेळी हायकोर्टानं शिंदे गटाला विचारला.

बीकेसी मैदानावर ठाकेर गटाच्या वकिलानं युक्तीवाद केल्यानंतर हायकोर्टानं शिंदे गटाच्या वकिलांना तुम्ही इतर कोणत्या मैदानावर परवानगी मागितली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचि प्रक्रिया काय होती? असा प्रश्नही कोर्टानं शिंदे गटाला विचारला. यावर शिंदे गटाकडून आम्ही रितसर अर्ज केला होता, ज्याप्रमाणे शिवाजी पार्कसाठी अर्ज केला होता, तसाच अर्ज बीकेसीमधील मैदानासाठी केला होता, असा युक्तीवाद करण्यात आला. आम्ही पहिल्यांदा याचिका दाखल केली होती, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली, असेही कोर्टाला सांगण्यात आलं.

काय झाला युक्तिवाद?

युक्तिवाद वाढवू नका, आम्हाला आदेशही द्यायचे आहेत, असे म्हणत हायकोर्टाकडून आजच निकाल देण्याचे संकेत मिळाले होते. केवळ दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवरच बोला, अशी सूचना हायकोर्टाकडून करण्यात आली. तुम्हाला बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली?असा सवाल हायकोर्टाकडून शिंदे गटाला विचारण्यात आला. आम्ही केलेल्या अर्जानुसार परवानगी मिळाली, असा युक्तीवाद सरवणकरांच्या वकीलाकडून करण्यात आला.

निवडणूक आयोगाच्या याचिकेप्रमाणे युक्तिवाद करू नका, असे हायकोर्टकडून सांगण्यात आलं. तुम्ही अन्य कुठे मेळाव्याची परवानगी मागितली आहे का? असा प्रश्नही यावेळी हायकोर्टाकडून विचारण्यात आला. एमएमआरडीए मैदानत त्यांनी आरक्षित केलंय, अशी माहिती ठाकरेंच्या वकिलांनी दिली. यावर सरवणकरांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, ही माहिती चुकीची आहे. आम्ही अन्य कुठेही परवानगी मागितली नाही.

हे ही वाचा:

बोगस जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ

मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच आवाज घुमणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss