Tuesday, September 24, 2024

Latest Posts

आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य आहे, कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदेगटाची पहिली प्रतिक्रिया

कोर्टानं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. शिवाजी पार्कसाठी ते कोर्टात गेले होते,

उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती आणि अखेर शिंदे गटाने हायकोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. २ ते ६

ऑक्टोबरपर्यंत शिवाजीपार्क वापराची परवानगी ठाकरे गटाला मिळाली. याबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्याशी चर्चा केली असता हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्याशिवाय आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेऊ, ते त्यांचा दसरा मेळावा घेतील, असेही गोगावले म्हणाले.

कितीतरी दिवसांपासून सुरू असलेल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? ह्या सामन्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर हायकोर्टात शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीकडून युक्तिवाद झाला. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.

कोर्टानं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. शिवाजी पार्कसाठी ते कोर्टात गेले होते, आम्हाला कोर्टानं दिलेला निकाल मान्य आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. आमचा कार्यक्रम होईल, त्यांचा ते करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली.

शिवाजी पार्कसाठी आम्ही प्रयत्न केला. पण कोर्टाच्या निकालाचा आम्ही आदर करतो. आम्हाला निकाल मान्य आहे. आम्हाला वादविवाद करायचे नाहीत, आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडायचे आहेत. आम्ही मागणी केली होती, आम्हाला परवानगी मिळाली असती तर आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला असता. पण आता आम्ही बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेऊ. बीकेसी मैदानही बाळासाहेब ठाकरे यांच्या घराच्या जवळच आहे, असे गोगावले म्हणाले.

हे ही वाचा:

बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? हायकोर्टाने केला शिंदे गटाला सवाल

मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच आवाज घुमणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss