Tuesday, September 24, 2024

Latest Posts

‘फक्त परवानगीच मिळाली ना? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं’, कोर्टाच्या निकालानंतर राणेंची बोचरी टीका

अखेर शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचाच आवाज घुमणार मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. २ ते ६ ऑक्टोबर पर्यंत ठाकरे गटाला हायकोर्टाने शिवाजी पार्क मैदान वापरण्यास परवानगी दिली आहे. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य नसल्याचे हायकोर्टाने म्हटले. मात्र, पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरून नसल्याचे हायकोर्टाने आजचा सुनावणीमध्ये म्हटले. आमच्या मते पालिकेने अधिकाराचा गैरवापर केला आहे. अशा शब्दात हायकोर्टाने पालिकेला सुनावले.

हेही वाचा : 

मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच आवाज घुमणार

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात हायकोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. राज्यभरातून शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा जोमात विरोधक कोमात अशा शब्दात शिंदे गट व भाजपला केंद्रबिंदू करत निशाणा साधला जात आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून देखील काही प्रतिक्रिया येत आहेत यात नारायण राणे यांचे सुपुत्र व भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले. ‘फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना? मला वाटले आदित्यच लग्न मुलीशी जमले म्हणून जल्लोष करत असतील ना** कुठले.’असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

 

आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य आहे, कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदेगटाची पहिली प्रतिक्रिया

‘कोर्टानं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. शिवाजी पार्कसाठी ते कोर्टात गेले होते, आम्हाला कोर्टानं दिलेला निकाल मान्य आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. आमचा कार्यक्रम होईल, त्यांचा ते करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली.

बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? हायकोर्टाने केला शिंदे गटाला सवाल

Latest Posts

Don't Miss