spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India VS Australia: भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचा दूसरा सामना काल नागपूरमध्ये खेळवला गेला. आणि या सामन्यात भारताने ६ गाडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. पावसामुळं हा सामना अवघ्या ८-८ षटकांचा खेळण्यात आला. रोहित शर्माने नाबाद ४६ धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. हार्दिक पांड्याने ९, राहुलने १० आणि विराटने ११ धावा केल्या. झाम्पाने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने २० चेंडूत ४३ तर कर्णधार फिंचने १५ चेंडूत ३१ असे धावा केल्या.

कालच्या सामन्यात भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजी बाजूने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाला आजचा विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई करत चौकार आणि षटकार ठोकत २३० च्या स्ट्राइक रेटने २० चेंडूत ४६ धावा अशी अफलातून खेळी केली. हिटमॅनच्या या खेळीमुळे काल भारतीय संघाने विजय मिळवत या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. अखेरच्या षटकात ९ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकी ८ षटकांचा होणारा सामन्यात भारताने संघात दोन बदल केले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली आहे तर उमेश यादवच्या जागी जसप्रीत बुमराह संघात आला आहे. रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्यानं हेझलवूडविरुद्ध दोन षटकार ठोकलं. या षटकारांसह रोहितनं टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहचलाय.

हे ही वाचा:

WhatsApp आणि OTT प्लॅटफॉर्म कायद्याच्या कक्षेत,जाणून घ्या दूरसंचार विधेयकाशी संबंधित महत्वाचे मुद्दे

Central railway : फर्स्ट क्लास तिकीट धारकांना आता, एसी लोकलमधील प्रवासाची तरतूद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss