Wednesday, September 25, 2024

Latest Posts

‘मै और मेरी नऊवारी’ फेम आर्याने लावले तरुणांना वेड

सध्या हसल 2.0 (Hustle 2.0) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात विविध तरुण-तरुणी सहभागी होऊन रॅप सादर करतात.

सध्या हसल 2.0 (Hustle 2.0) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात विविध तरुण-तरुणी सहभागी होऊन रॅप सादर करतात. या कार्यक्रमाचे परीक्षण प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Baadshah) हा करत आहे. या कार्यक्रमातील एका रॅपने सोशल मीडियावर सर्वाना वेड लावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarya Jadhao (@aarya.qk)

 हा कार्यक्रम प्रेक्षक एम टिव्हीवर पाहू शकतात. या कार्यक्रमामधील एका एपिसोडमध्ये एका तरुणीने मराठी रॅप सादर केले आहे. सध्या हे रॅप सोशलमिडीयावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आर्या जाधव (Aarya Jadhao) या तरुणीनं हसल 2.0 या कार्यक्रमात मराठी रॅप सादर केला. या रॅपच्या ओळींनी अनेकांचे लक्ष वेधले. ‘मै और मेरी नऊवारी’ अशा या रॅपच्या ओळी आहेत. आर्याच्या या रॅपनं परीक्षक आणि तिथे उपस्थित असलेल्या काही रॅपर्सची मनं जिंकली. आर्यानं रॅपमध्ये केलेला शब्दांचा वापर अतिशय चांगला आहे. ‘ हसलच्या एपिसोडमधील रॅपचा व्हिडीओ आर्यानं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आर्या नाकात नथ, नऊवारी अन् चंद्रकोर अशा लुकमध्ये दिसत आहे. आर्यानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी कमेंट करुन तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. आर्या ही अमरावतीची आहे. तिच्या रॅपमधून तिनं महाराष्ट्राची संस्कृती मांडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarya Jadhao (@aarya.qk)

 हसल 2.0 हा कार्यक्रम एम. टिव्हीबरोबरच वूट या अँपवर देखील प्रेक्षक पाहू शकतात. बादशाहसोबतच EPR, King, Dino James आणि Dee MC हे रॅपर्ससुद्धा या कार्यक्रमाचं परीक्षण करतात.या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. हसल कार्यक्रमाचा सध्या दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचं परीक्षण रफ्तार आणि राजाकुमारी हे रॅपर्स करत होते. आर्याचा रॅप ऐकल्यानंतर दीपा उन्नीकृष्णन या रॅपरनं कौतुक केलं. रॅपर बादशाहनं आर्यानं रॅपमध्ये वापरलेल्या शब्दांचे भरभरुन कौतुक केले. आर्याचा रॅप ऐकून बादशाह म्हणाला, ‘हा रॅप रेडिओ रेडी आहे.

हे ही वाचा:

Airtel Users : दिवाळी आधीच एअरटेलचा धमाका, ‘या’ प्लॅनसह मोफत डिस्ने प्लस व हॉटस्टार सबस्क्रिप्शन

अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत- दुश्मन आपल्या आजुबाजूलाच आहे, हिंदू सण तोंडावर आणि संकट ….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss