spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’, आशिष शेलार यांची जोरदार टीका

आज भाजप नेते आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि या दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

आज भाजप नेते आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि या दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

अमित शहांना आव्हान देण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. त्यांनी आरसा घेऊन उभं राहण्याची गरज आहे. आपण ज्यांना आव्हान देतोयत त्यांच्या ताकदीसमोर आपण कुठे उभे आहोत, हे त्यांना कळेल. स्वतःच्या हिंमतीवर तुम्ही एकदातरी महाराष्ट्रात सरकार आणले आहे का? तुम्ही शिवसेनेचे (shivsena) १०० आमदार तरी निवडून आणले आहेत का? १०० सोडाच पण ७५ चा आकडा तरी कधी पार केला आहे का? असा सवालच आशिष शेलार यांनी केला आहे. ज्या शहांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकदा नाही तर दोनदा शंभर आमदार निवडून आणले, त्यांना तुम्ही आव्हान देतात. म्हणजेच सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे सांगत कौआ हंस की चाल नहीं चल सकता, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे. तसेच पुढे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं, यावर विचारलं असता आशिष शेलार म्हणाले की, या प्रकरणाशी आमचा काय संबंध आहे. प्रकरण शिंदे गट आणि पेग्विंन सेना मध्ये होते. त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. ज्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तीच खरी शिवसेना आहे.

उद्धव ठाकरेंपाठोपाठ आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या आक्रोश मोर्चावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्या तळेगाव येथील आंदोलनावर आशिष शेलार यांनी टीकेचा बाण सोडला. आदित्य यांनी आधी किती टक्केवारी घेतली हे सांगावं, त्यांच्यामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेला आहे, असा टोला शेलार यांनी लगवाला. कुठलीही लढाई जिकण्याआधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकिला सामोरे जावे, असेही शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकांना भ्रमित करणारी असून मराठी – गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत. चहाच्या ऐवजी आणखीन काही घ्यायचं ठरवलं आहे असं दिसतंय ते धादांत खोटं बोलत आहेत, असे शेलार म्हणाले.

तसेच पुढेच ते म्हणाले, आता तर त्यांची एक जखम समोर आली आहे त्यामुळे ते बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्या गृहमंत्री खात्यासंदर्भातील वक्तव्यावर दिली. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही शेलार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गृहमंत्री कुणालाही भेटू शकतात, त्यांनी वेळ दिला तर मी काय बोलू.. ते भाजपत येणार का ? यावर गृहमंत्री निर्णय घेतील मी काय बोलू… असे शेलार म्हणाले. पुढे पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावर बोलताना आशिष शेलार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. घोषणा देणाऱ्यांना ठेचून काढले पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील तीच भूमिका असेल, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेय.

नवरात्रीमध्ये भाजप करत असलेल्या तयारीबाबात भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपने गोविदा आणि गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला. आता भाजप मुंबईत उदे गं अंबे उदे असा जल्लोष करणार आहे. ५० ठिकाणी गरबा, दांडिया आयोजित करणार आहे. मुंबईमध्ये ४९ थेट मोठे गरबे, २४२ मंडळे जवळपास ३०० ठिकाणी उदे गं अंबे उदे चा नारा देणार आहेत. अवधूत गुप्ते यांचा मराठी दांडिया होणार आहे. प्रवीण दरेकर बोरिवली पश्चिम येथे प्रीती पिंकीला घेऊन दांडिया आयोजित करत आहेत. गोपाळ शेट्टी, संतोष सिंग हे प्रमोद महाजन क्रीडांगण येथे फाल्गुनी पाठक याचा गरबा आयोजित करणार आहेत.

PFI प्रकरणात पुण्यात जी घोषणाबाजी झाली, त्या वर्तणुकीला ठेचून काढलं पाहीजे, अशी आमची भाजपाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी आहे. ते देखील या मागणीप्रमाणे निर्णय घेतली, अशी अपेक्षा आहे. PFI वर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली आहे, ती योग्यच आहे. ज्यापद्धतीने या देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते, त्याविरोधात हा लढा आहे, असं आशिष शेलार म्हणाले. ज्या ज्या वेळी देश बलवान होतो, त्यावेळी देश विघातक शक्ती स्वतःची नखं दाखविण्याचे प्रयत्न करतात. आम्हाला आनंद आहे की, केंद्र सरकारने यांना उखडून टाकण्याचे ठरविले आहे. या कारवाईला आमचे समर्थन आहे. पटना असो किंवा मोदीजींची सभा असो.. मोदींजींना लक्ष्य करणारे बोलणारे सगळेच कधी कधी देशाच्या स्वाभिमानाचा त्यांना विसर पडतो, असंही त्यांनी सांगितलं. काल परवा हजार – दोन हजार लोकांसमोर एनएसईमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग केला. त्या सभेत पीएफआय किंवा तत्सम दहशतवादी इस्लामी संघटनांवर बोलण्याचे त्यांनी का टाळले? याचे उत्तर ते देतील का? असा सवालही त्यांनी केला.

कोस्टल रोडसाठी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात आल्या, हे देखील खोटे आहे. आदित्य ठाकरे यांनी सध्या चहा ऐवजी इतर पेय घ्यायचे ठरविलेले दिसते. ते पेय योग्य आणि सुविधाजनक असेल अशी माझी त्यांना विनंती आहे. एवढे खोटे बोलण्याची गरजच नाही. १ हजार ७२५ लोक मुंबईतील सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोस्टल बाजूवर काम करण्याची क्षमता असलेले इथेच भरती झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या इंजिनिअर्सची उपलब्धताच नाही. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेता इतर ठिकाणाहून मनुष्यबळ आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे वांद्रे – वर्सोवा पुढे बोरीवली-विरार पर्यंतच्या कोस्टल रोडला ते थांबवू पाहत आहेत. आदित्य ठाकरे प्रकल्पविरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 

हे ही वाचा:

कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंचे पारडे जड तर, शिंदे पितापुत्राच्या जबाबदारीत वाढ

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; त्याला शोधून त्यावर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss