spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर CM शिंदेंचं ट्वीट; तर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

एनआयएच्या कारवाईच्या विरोधात पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती.

एनआयएच्या कारवाईच्या विरोधात पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. ईडी, भाजप आणि तपास यंत्रणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पण समाजमाध्यमांवर पीएफआय कार्यकर्त्यांनी पुण्यातील आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा करण्यात आला. सोशल मीडियावरही असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन नवा वाद उफाळला आहे. आता या सर्व प्रकरणी राजकीय नेत्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या सर्व प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांच्या एफआयआरमध्ये मात्र पाकिस्तान झिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणेचा उल्लेख नाही.

 आता राजकारण तापलेले असताना यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.

 तसेच दुसरीकडे या सर्व परकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी ट्वीट करत हा इशारा दिला असून, यामध्ये त्यांनी एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकान्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असे म्हटले आहे. माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही. नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.

हे ही वाचा:

‘खोके सरकारचा आवाज जास्त आणि काम कमी’ जनआक्रोश आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा टोला

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; त्याला शोधून त्यावर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss