spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व

यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्रात देवीची विशेष उपासना केली जाणार आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते.

यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्रात देवीची विशेष उपासना केली जाणार आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, समृद्धी व वैभव प्राप्त होते अशी धार्मिक श्राद्धा आहे. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते.   Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे (Nine Colours) कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदाच्या नऊ रंगांबद्दल जाणून घेऊया.   Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

 

सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ, पांढरा रंग.
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.

मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग.
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.

बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग.
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे.

गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग.
चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्तांना संतती, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते.

शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ पाचवी माळ, हिरवा रंग.
पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे.

शनिवार १ ऑक्टोबर २०२२ सहावी माळ, करडा रंग.
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता.

रविवार २ ऑक्टोबर २०२२ सातवी माळ, नारिंगी रंग.
सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.

सोमवार ३ ऑक्टोबर २०२२ आठवी माळ, गुलाबी रंग.
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.

मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ नववी माळ, जांभळा रंग.
नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे.

 

हे ही वाचा:

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कळस स्थापनेचे महत्व आणि पूजा विधी कशी करायची?, जाणून घ्या

Navratri 2022 : दुर्गा मातेने अप्सरचे रूप धारण करून, केला महिषासुराचा वध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss