spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन म्हणाले, कुणी एक मारली तर तुम्ही…

तुम्हाला कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा, कुणी तुम्हाला एक मारली असेल तर तुम्ही त्याला चार मारा.

परभणीत जात असणारा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा काल शिवसैनिकांनी अडवून धरला होता. त्यानंतर आता संतापलेल्या सत्तारांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरेंवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. मेळाव्यात बोलताना सत्तारांनी शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, तुम्हाला कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा, कुणी तुम्हाला एक मारली असेल तर तुम्ही त्याला चार मारा. कृषिमंत्री सत्तारांनी कार्यकर्त्यांना दिलेला हा अजब सल्ला सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे आता मराठवाड्यात शिंदे समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीच्या सदस्याला मेजॉरिटी कळते परंतु उद्धव ठाकरेंना कळत नाहीये. ठाकरे मुख्यमंत्री असताना ते निवेदनं घेऊन मागे द्यायचे, त्यावर काहीही कार्यवाही व्हायची नाही. परंतु आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवेदनं घेतात आणि प्रश्नही सोडवतात, असेही हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त मराठवाडा दौऱ्यावर असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

आगामी काळात आणखी दोन ते तीन आमदार आणि चार ते पाच खासदार हे शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत, असा मोठा गौप्यस्फोट देखील कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केला आहे. तुमच्या भागातील अधिकारी तुमचं काम करत असेल तर तो तुमच्यावर उपकार करत नाहीये. ते त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळं कुणाचाही दबाब सहन करू नका, जशास तसं उत्तर द्या, असा सल्ला मंत्री सत्तारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

हे ही वाचा:

मुकेश अंबानींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; ‘वर्षा’ वर झाली तासभर चर्चा

मुकेश अंबानींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; ‘वर्षा’ वर झाली तासभर चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss