spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राणा नायडूचा टीझर झाला रिलीज, सिनेसृष्टीतील सुपरस्टार काका – पुतण्या येणार आमने – सामने

नेटफ्लिक्स (Netflix) ने त्यांच्या जागतिक कार्यक्रम 'Tudum' च्या भारतीय आवृत्तीत अनेक आगामी प्रकल्पांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 'राणा नायडू' चा देखील समावेश आहे. 

‘बाहुबली’मध्ये भल्लाल देवची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करणारा राणा डग्गुबती त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आता तो एका दमदार अॅक्शन अवतारात पडद्यावर येणार आहे. त्याच्या ‘राणा नायडू’ या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे, जो खूपच दमदार दिसत आहे. नेटफ्लिक्स (Netflix) ने त्यांच्या जागतिक कार्यक्रम ‘Tudum’ च्या भारतीय आवृत्तीत अनेक आगामी प्रकल्पांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ‘राणा नायडू’ चा देखील समावेश आहे.

या सिरीजमध्ये एका ‘फिक्सर’च्या भूमिकेत राणा दिसणारा आहे. म्हणजे सेलिब्रिटींच्या आयुष्यात काही घोटाळे झाले तर त्याला सामोरे जाणे हे या पात्राचे काम आहे. ‘राणा नायडू’ चित्रपटाचा टीझर सांगत आहे की राणा डग्गुबतीने साकारलेले पात्र त्याच्या कामात अतिशय प्रोफेशनल आहे आणि त्याने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. टीझरमधील राणाच्या व्यक्तिरेखेचा डायलॉग आहे-‘राणा जुड़ा है, मतलब कांड बड़ा है’.

टीझरमधील राणाची व्यक्तिरेखा इतकी भयानक आहे की त्याला थांबवणं एका माणसाशिवाय कुणाच्याही हातात नाही. येथे व्यंकटेश दग्गुबतीच्या पत्राचा कथेत प्रवेश होतो,जो वास्तविक जीवनात राणा दग्गुबतीचा मामा आहे आणि एक मोठा तेलगू स्टार आहे. हिंदी प्रेक्षकांना त्यांना ‘अनाडी’ (१९९३) आणि ‘तकदीरवाला’ (१९९५) सारख्या चित्रपटांमध्ये पहिल्याच आठवत असेल.

‘राणा नायडू’मधलं व्यंकटेशचं पात्रही खूप हिंसक आहे आणि राणाला रोखण्याची सर्व ताकद त्याच्यात आहे. टीझरमध्ये तो एका ठिकाणी राणाला ‘बाप हूँ तेरा’ असं म्हणताण दिसत आहे. त्यामुळे आता हे पाहणे मनोरंजक असेल की असे काय कारण आहे ज्यामुळे वडील आणि मुलगा दोघेही एवढे हिंसक स्वभावाचे दाखवले आहेत, ज्यामुळे ते एकमेकांवर बंदुका रोखण्यासही मागेपुढे पाहत नाहीत.

व्यंकटेश आणि राणाचा फेस-ऑफ खूपच रंजक आहे आणि टीझरमध्येच ते दोघे समोरासमोर येताना जणू काही बॉम्ब फुटणार आहे असे वाटू लागते. नेटफ्लिक्सच्या या वेब सिरीजमध्ये सुरवीन चावला, सुशांत सिंग आणि आशिष विद्यार्थी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. शोची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, पण ‘राणा नायडू’ येत्या काही महिन्यांत रिलीज होऊ शकतो, असे मानले जात आहे.

हे ही वाचा:

Mann ki Baat: चंदीगड विमानतळाल आता ‘ या ‘ नावाने ओळखले जाणार, नरेंद्र मोदींची नवी घोषणा

पुण्यात पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, शिवसेनेनी केला निषेद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss