spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मैने पायल है छनकाईच्या रिमेकसाठी फाल्गुनी पाठकने नेहा कक्करला फटकारले

"मला तीन-चार दिवसांपूर्वी रिमिक्स आवृत्तीबद्दल माहिती मिळाली.मी हे गाणे पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मला ते आवडले नाही आणि हे गाणं ऐकताच मला उलटीसारखे झाले."

या आठवड्याच्या सुरुवातीला ओ सजना नावाचा तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज झाल्यापासून, नेहा कक्कर टीकेला सामोरे जात आहे. हा ट्रॅक फाल्गुनी पाठकच्या मैने पायल है छनकाई या आयकॉनिक हिट गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. नेहाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले गेले आहे आणि नेटीझन्सने दावा केला आहे की तिने तिच्या करमणुकीने त्यांचे बालपण बरबाद केले आहे.

आता, दांडिया क्वीन फाल्गुनीने रिमिक्स ट्रॅकवर तिची धक्कादायक पहिली प्रतिक्रिया शेअर केली आहे. फाल्गुनी पाठक म्हणाली, ‘मुझे बस उल्टी आनी बाकी थी’. तिने असेही म्हटले आहे की रीमिक्स केलेल्या आवृत्तीने तिच्या ट्रॅकची ओरिजिनॅलीटी बदलून त्यातला निरागसपणा, भावना आणि सार नष्ट केले आहे.

दिल्ली टाइम्सशी बोलताना, ५३ वर्षीय गायीका, ज्यांच्या इतर हिट गाण्यांमध्ये चुडी जो खनकी हाथों में आणि मेरी चुनर उड उड जाये यांचा समावेश आहे, म्हणाल्या, “मला तीन-चार दिवसांपूर्वी रिमिक्स आवृत्तीबद्दल माहिती मिळाली.मी हे गाणे पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मला ते आवडले नाही आणि हे गाणं ऐकताच मला उलटीसारखे झाले.”

त्या पुढे म्हणाल्या, ” व्हिडिओ आणि चित्रीकरणात जी निरागसता होती ती या गाण्यात पूर्णपणे नष्ट केली आहे. रीमिक्स तयार करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ती चांगल्या पद्धतीने करा. तरुण पिढीपर्यंत गाणे पोहोचायचे असेल तर गाण्याचा टेम्पो बदला. पण त्याचा दर्जा घसरवू नका. गाण्यातील मौलिकता, भावना, सार, निरागसता, तर जपाचा पण किमान गाण्याची ओरिजिनॅलीटी नष्ट करू नका..”

ओ सजनाला अपमानित करणाऱ्या नेटकऱ्यांच्या स्टोरीज फाल्गुनी पाठक स्वतःच्या अकाउंटवरून शेअर करता आहेत. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मला काही करण्याची गरज वाटत नाही; माझे चाहते गाण्यावर कारवाई करत आहेत. मी फक्त स्टोरी शेअर करत आहे. ते मला सपोर्ट करत असताना मी गप्प का बसू,”

मूळ गाणे ललित सेन यांनी तयार केली होते आणि लिहिले होते , तर या गाण्याचा रिमिक्स हा तनिष्क बागची याने संगीतबद्ध केला आहे, जो त्यांच्या बॉलीवूड रीमिक्ससाठी ओळखला जातो.

हे ही वाचा:

राणा नायडूचा टीझर झाला रिलीज, सिनेसृष्टीतील सुपरस्टार काका – पुतण्या येणार आमने – सामने

Big Boss Marathi 4 : “चटर पटर चटर पटर… “, बिग बॉस मराठीच्या सीझन ४ चं टायटल साँग रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss