spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जर तुमचा घसा खवखवत असेल तर करा घरगुती उपाय

हिवाळा लवकरच सुरु होणार आहे. या ऋतूमध्ये लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमध्ये घसा खवखवण्याच्या समस्येचा समावेश असतो. घसादुखीमुळे बोलायला त्रास होण्यासोबतच खाण्यापिण्यातही त्रास होतो. तुम्हाला खराब घसा बरा करायचा असेल तर त्यासाठी घरगुती उपाय केले पाहिजे. त्यामध्ये तुम्ही घरातल्या मसाल्यांचा वापर करू शकता. तसेच सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी घशात ऍलर्जी देखील होते.

हे ही वाचामहिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

 

घरगुती उपाय –

तुमचा घसा खूप खवखवत असेल तर तुम्ही कोमट गरम पाण्यामध्ये मीठ मिक्स करून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता. त्यामुळे तुमचा घशाला आराम मिळू शकतो.

जर तुमच्या घशात सूज असेल तर तुम्ही कोमट गरम पाण्याचा वापर करू शकता.

मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो.

रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये हळद मिक्सकरून पिणे त्यामुळे घशाला आराम मिळतो. आणि घसा दुखणेपण कमी होते.

घसादुखी किंवा सर्दी खोकला झाल्यास आल्याचा वापर करा. आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा चहा पिणे. किंवा तुम्ही चहामध्ये तुळशीचे पाने , लवंग , दालचिनी , वेलची घालून काडा देखील बनवून पिऊ शकता.

 

१ चमचा आल्याचा रस घ्या. त्यात थोडा मध आणि १ चिमूट काळी मिरी बारीक करून सेवन करा. हे घशाला उबदारपणा देईल, ज्यामुळे घशातील वेदना कमी होतील.

तुळशीची पाने १ कप पाण्यामध्ये उकळा त्याचे सेवन करा.

घसा खवखवण्याची समस्या कमी करण्यासाठी लवंग आणि काळी मिरी हा चांगला उपाय आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात १ ते २ लवंग काळी मिरी पावडर आणि मध घालून चांगले उकळा. आता हे पाणी चहासारखे प्या. यामुळे घशाच्या संसर्गापासून सुटका होईल. यासोबतच घशाच्या इतर समस्याही दूर होतील.

हे ही वाचा :

सणासुदी मध्ये पैशाची बचत कशी कराल

 

Latest Posts

Don't Miss