Wednesday, September 25, 2024

Latest Posts

नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी बेस्टची भन्नाट ऑफर….

नवरात्रीउत्साव उत्सव निमत्त बेस्टने मुंबईकरांन अस्थी खास ऑफर आणली आहे. डिजिटल प्रवासाला चालना देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नवरात्र उत्सवात विशेष ऑफर (BEST Navaratri 2022 Offer) आणली आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने नवरात्रोत्सव आणि दसरा मध्ये प्रवाशांसाठी विशेष ऑफर दिली आहे. केवळ १९ रुपयांचे तिकीट काढल्यानंतर नवरात्रोत्सवात १० बसफेऱ्यांची सुविधा मिळणार आहे.

बेस्ट प्रशासनाची ही खास ऑफर २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. चलो अॅपवर १९ रुपयांच्या तिकिटात नऊ दिवसांत कधीही फक्त १० बसफेऱ्यांचा प्रवास प्रवाशांना करता येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. चलो अॅप डाउनलोड केल्यानंतर बसपास पर्याय हा निवडावा. बसपास पर्याय निवडल्यानंतर दसरा ऑफर पर्याय निवडावा. त्यानंतर आपली सविस्तर माहिती नोंद करावी. ही माहिती भरल्यानंतर डेबिट कार्ड, यूपीए, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे १९ रुपयांचे तिकीट मिळणार आहे. या १९ रुपयांमध्ये ९ दिवस १० वेळा प्रवास करता येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘बेस्ट’ने चलो अॅप लाँच केले होते. अॅपद्वारे बसचे तिकीट बुक करता येते. त्याशिवाय स्मार्ट कार्डच्या आणि अ‍ॅपच्या मदतीने ते बस पास काढणे अथवा नूतनीकरण करता येते. त्यामुळे पाससाठीच्या रांगा कमी झाल्या आहेत. चलो अॅपद्वारे बसचे लाइव्ह लोकेशन आणि बसमध्ये किती गर्दी आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होतो. मोबाईल अ‍ॅप वापरुन कोणत्याही बसमध्ये किंवा ऑनलाईन रिचार्ज करता येईल. १० रुपयांच्या पटीत ३००० रुपयांपर्यंत कितीही रक्कमेचा रिचार्ज करता येईल. कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाह्य होत नाही.

काही महिन्यांपूर्वीच बेस्टने काही मार्गांवर इलेक्ट्रिक एसी बस सुरू केल्या आहेत. येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून इलेक्ट्रिक डबलडेकर बस प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.

हे ही वाचा:

आयएनएलडीच्या रॅलीत विरोधी नेते एकत्र आले; नितीश, पवार यांची उपस्थिती

Vikram Vedha चे ऍडव्हान्स बुकिंग झाले सुरु; चित्रपटाने केली इतक्या ‘लाखांची’ कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss