spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022: नवरात्रीच हटके सेलिब्रेशन, स्विमिंग पूलमध्ये गरबा करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

'लवयात्री' चित्रपटातील बॉलीवूडच्या प्रसिद्ध 'गरबा' गाण्यावर एक गट स्विमिंग पूलमध्ये 'गरबा' सादर करताना दिसत आहे.

नवरात्री, दुर्गापूजा, दिवाळी आणि इतर सण जवळ येत असताना सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे. नवरात्री अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने, लोक त्यांच्या गरबा सरावाला चालना देत आहेत कारण नवरात्राच्या ९ दिवसांत केले जाणारे हे सर्वात आकर्षक पारंपारिक नृत्य आहे.

पारंपारिक पोशाख आणि दागिने घालून लोक ‘गरबा’ करतात आणि ‘दांडिया’ खेळत असले तरी राजस्थानच्या उदयपूरच्या या गटाने स्विमिंग पूलमध्ये परफॉर्म करून गरब्यात आणखी मजा आणखी वाढवली आहे. होय! तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे- जलतरण तलावातील ‘गरबा’.

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘लवयात्री’ चित्रपटातील बॉलीवूडच्या प्रसिद्ध ‘गरबा’ गाण्यावर एक गट स्विमिंग पूलमध्ये ‘गरबा’ सादर करताना दिसत आहे. ANI नुसार राजस्थानच्या उदयपूरमध्ये स्विमिंग पोलमध्ये गरबा आयोजित करण्यात आला होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि इंटरनेटवर त्याचे वेड लागले आहे. ४० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत कमेंट केल्या आहेत आणि समर्थन केले आहे, परंतु काही काही लोकांनी भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्य घटकांनी प्रवेश केला आहे असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

Navratri 2022 : नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व

Navratri 2022: यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष… घ्या जाणून शुभ मुहूर्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss