spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांचे वादग्रस्त व्यक्तव्य चर्चेत म्हणाले, ‘खाज का निर्माण झाली?

कायम आपल्या वक्तव्य आणि विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील असा शब्दही सावंत यांनी दिला. मात्र विरोधकांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेलं विधान वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या शैलपुत्री रुपाची महापूजा

महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, “दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच” असंही म्हटलं. “आम्हाला आरक्षण पाहिजेच. मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय,” असं मराठा सामाजातील नेते असणाऱ्या सावंत यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचा ‘एकला चलो रे’चा नारा आता कोकणाकडे वळणार, विदर्भानंतर आता मिशन कोकण

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावं सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का असा खडा सवाल करत तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा असेही केदार यांनी म्हटले.

‘मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, असा जाबही मराठा क्रांती मोर्चाने विचारला आहे.

राशी भविष्य २६ सप्टेंबर २०२२, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे

Latest Posts

Don't Miss