spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची घोषणा

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे.

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे हा सण मोठ्या उत्सहात साजरा करायला मिळाला नाही परंतु या वर्षी हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे.

 नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. तसेच या संदर्भात एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि त्यामध्ये ते म्हणाले आहेत, आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” (Mata Surakshit Tar Ghar Surkshit) हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. वैद्यकीय अधिकारी स्वत तपासणी करतील. आजारी महिलांना उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनं राज्यभरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवलं जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते २ या वेळेत १८ वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.

हे ही वाचा:

Stock Market : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची घसरण

Ghatasthapana Navratri 2022 : घटस्थापना पूजा विधी कशी करावी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss