spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

क्रोमाच्या फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स सेलमध्ये iPhone 13 मिळणार फक्त ५१,९९० रुपयांत

यामुळे डिव्हाइसची किंमत प्रभावीपणे ५१,९९० रुपयांवर जाईल. सध्या ते ६४,९९० रुपयांना विकले जात आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये iPhone 13 खरेदी करणे चुकले ? तर काळजी करण्याची गरज नाही कारण टाटाचे क्रोमा स्टोअरमध्ये तुम्ही तो आता खरेदी करू शकता. टाटा त्याच्या Tata Neu अॅप आणि क्रोमा ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर इलेक्ट्रॉनिक्सवर एक भव्य विक्री आयोजित करत आहे, जिथे iPhone 13 कमीत कमी रु ५१,९९० मध्ये उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त, इतर Apple उपकरणे देखील इथे खरेदी करता येतील.

या सवलतीच्या किंमतीमध्ये सर्व ऑफर समाविष्ट असतील, बहुधा बँक ऑफर ICICI बँकेकडून. ऑनलाइन स्टोअरनुसार, ICICI बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के झटपट सूट आहे. यामुळे डिव्हाइसची किंमत प्रभावीपणे ५१,९९० रुपयांवर जाईल. सध्या ते ६४,९९० रुपयांना विकले जात आहे.

हा स्मार्टफोन मिडनाईट, ब्लू, प्रॉडक्ट रेड, ग्रीन, स्टारलाइट आणि पिंक अशा सर्व रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. हे फोन Croma.com, Tata Neu अॅप आणि ऑफलाइन Croma आउटलेट्सवरून देखील खरेदी करू शकतात.

Apple Watch SE १९,९९० रुपयांना उपलब्ध आहे.
या व्यतिरिक्त, Apple Watch SE वर देखील एक डील आहे. वेअरेबल साधारणपणे २६,९९० रुपयांना विकले जाते, परंतु ते आता क्रोमावर १९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. Apple Watch SE सुद्धा ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमधून लगेच खरेदी केला जाऊ शकतो.

लक्षात घ्या की हे Apple Watch SE चे जुने २०२० मॉडेल आहे आणि नवीन २०२२ मॉडेल नाही. Watch SE २०२० Apple च्या S5 चिपसेटसह येतो आणि नवीन Apple Watch SE सारख्या डिझाइनसह त्यात बहुतेक वैशिष्ट्ये आहेत.

याशिवाय, नवीन iPhone 14 आणि iPhone 14 Pro मॉडेल देखील बँक कार्ड ऑफरसह सेलमध्ये उपलब्ध असतील.

हे ही वाचा:

‘जाहिरातींचा त्रास होत असेल… ‘, जैन संस्थांची याचिका हायकोर्टानं फेटाळली

शाहरुख खानला मोठा दिलासा, वडोदरा स्टेशन चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयाने खटला रद्द केला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss