spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सहेला रे…’, अभिनेत्री मृणाल कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चर्चेत आली आहे. खऱंतर पोस्ट त्यांच्या नव्या सिनेमा संदर्भातली आहे. सिनेमाचं नाव जितकं कॅची आहे,तितकीच त्याची टॅगलाईन देखील कॅची आहे.

मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चर्चेत आली आहे. खऱंतर पोस्ट त्यांच्या नव्या सिनेमा संदर्भातली आहे. सिनेमाचं नाव जितकं कॅची आहे,तितकीच त्याची टॅगलाईन देखील कॅची आहे. सिनेमात एक परिपक्व कथा पहायला मिळणार हे सिनेमातील कलाकार पाहिले की आपल्या लक्षात येईलच .

‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनीने प्रेक्षकांना विविध विषयांवरील अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. आता असाच एक दर्जेदार वेबचित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ (Sahela Re) हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब चित्रपटात मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghavan) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ‘ सहेला रे’चे पोस्टर झळकले असून ही एक नातेसंबंधावर भाष्य करणारी कथा असल्याचे कळतेय. ‘काही नात्यांना नाव नसतं’, अशी टॅगलाईन असलेल्या या वेबचित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2)

 तसेच या संदर्भांत अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनि एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि हि पोस्ट देखील सध्या मोठ्या प्रमाणत चर्चेत आहे. अनेक नागरिकांनी या पोस्टवर कंमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तर नुकताच 5 वा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्येही ‘सहेला रे’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. अशा अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच पसंती दर्शवतील. अक्षय बर्दापूरकर व ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत ‘सहेला रे’ची कथा, पटकथा आणि संवादही मृणाल कुलकर्णी यांचे आहेत.

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”ही एक परिपक्व नात्याची कहाणी असून नात्यातील विविध पैलू यात अलगद उलगडणार आहेत. नकळत स्वतःचाच स्वतःला नव्याने शोध लागेल. मुळात ही एक संवेदनशील आणि कौटुंबिक कथा असून ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यातील कलाकार, कथानक, दिग्दर्शन अशा अनेक जमेच्या बाजू असून लवकरच प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा चित्रपट पाहाता येणार आहे.”

हे ही वाचा:

राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेत भावूक झाले भारती सिंघ आणि कपिल शर्मा

आता iPhone 14 देखील असणार ‘मेड इन इंडिया’, भारतात लवकरच सुरू होणार उत्पादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss