Wednesday, September 25, 2024

Latest Posts

नवरात्रीच्या उपवासामध्ये बनवा स्पेशल कूकीज

तर आज आम्ही तुम्हाला नवरात्री स्पेशल कुकीज दाखवणार आहोत आणि हे तुम्हाला नक्की आवडतील .

नवरात्री मध्ये नऊ दिवस निर्जला उपवास केला जातो . नवरात्री हा सण खूप खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो . नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते आणि तिला विविध प्रकारचे प्रसाद दाखवले जातात . नवरात्रीमध्ये भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते . नवरात्री हा सण म्हटल्यावर डोळ्यांसमोर दांडिया – गरबा येतो आणि उपवासाचे पदार्थ येतात . तसेच आपण उपवासामध्ये राजगिऱ्याचे लाडू , वरीची खिर , साबुदाणा खिचडी , बटाटा पुरी असे पदार्थ खायाला कंटाळा येतो . उपवास म्हटल्यावर आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आणि उपवासामध्ये नक्की कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न पडतो . तर आज आम्ही तुम्हाला नवरात्री स्पेशल कुकीज दाखवणार आहोत आणि हे तुम्हाला नक्की आवडतील .

रेसिपी –

कुकीज बनवण्याचे साहित्य –

  • वरीचे पीठ आणि साबुदाण्याचे पीठ १ वाटी
  • १ वाटी लोणी (Butter)
  • अर्धी वाटी पिठी साखर
  • २ टेस्पून खोबऱ्याचा किस
  • वेलची पावडर
  • बेकिंग पावडर
  • चवीनुसार मीठ
  • बदाम

कुकीज बनवण्याची कृती –

सर्व प्रथम लोणी बाउलमध्ये घेणे आणि ते ग्राईंड करून घेणे . त्या बाऊलमध्ये वरीचे पीठ आणि साबुदाण्याचे पीठ घालणे. त्यानंतर त्यात पिठी साखर , बेकिंग पावडर, मीठ , वेलची पावडर हे सर्व घालून मिश्रण मिक्स करून घेणे . वरून खोबरे घालणे. परत हे मिश्रण ग्राईंड करून एकजीव करून घेणे . मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये परत एकदा वरीचे आणि साबुदाण्याचे पीठ मिक्स करून घेणे आणि पीठ मळून घेणे आणि त्याचे बारीक चपट गोळे तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये बदाम वरून लावणे आणि १५ मिनिटे फ्रिज मध्ये ठेवणे. नंतर ते काढून घेणे आणि उकडून घेणे.

हे ही वाचा:

गुरु ग्रह आज ५९ वर्षात पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार; जाणून घ्या नक्की कसे पाहता येणार हे दृश्य

आजच्या काळातही समाजाच्या उभारीसाठी महात्मा फुले यांचे विचार अतिशय उपयुक्त – शरद पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss