spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई समोरे जा’ आशिष शेलार संतप्त

गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राजकीय सामना जनतेला पाहायला मिळत असला, तरी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वितुष्ट आता अधिकच वाढले आहे. तर, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं चित्र आत्तापासूनच पाहायला मिळत आहे. अशातच आता वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टिकेच केंद्रबिंदू केलं आहे. शेलार यांनी वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणी तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर केला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाना साधला आहे. “ठाकरे सरकारच्या अडिच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला, हा घ्या सरकारी पुरावा…. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडिच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!”

हेही वाचा : 

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार ?

“या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला समोरे जा…अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये?”, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगावमधील जनआक्रोश आंदोलनात बोलत होते. फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावात होणार होता. मात्र तो प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटीला अंधेरीतून अटक

जनआक्रोश मोर्चा दरम्यान आदित्य ठाकरेंनी भाषण करताना राज्यसरकारची कान उघडणी केली. “महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरूणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेला. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत”.

“महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले मात्र त्यातील एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. त्यात फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर गेले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठा उपलब्ध होणार होता. परंतु, या सरकारने तरुणांच्या तोंडातील घास हिरावून घेतला”, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

नवरात्री स्पेशल बटाटा पुरी आणि दही साबुदाणा खिचडी रेसिपी जाणून घ्या

Latest Posts

Don't Miss