spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबाद-सोलापूरमधून PFI चे कार्यकर्ते ताब्यात

महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली.

महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली. दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Maharashtra ATS) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे.

औरंगाबाद (Aurangabad) आणि सोलापूरमधून (Solapur) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यलयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास १०० जणांना अटक करण्यात आली होती. सोलापूरमध्येही PFI विरोधात NIA ने कारवाई केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूरमधून NIA ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीला NIA च्या पथकाने आपल्या सोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी १३ ते १४ कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसकडून रात्रभर छापेमारीची कारवाई सुरू होती.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी केली. प्राथमिक वृत्तानुसार, तपास यंत्रणांनी आसाममधून ७ जणांना आणि कर्नाटकमधून १० जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. आसाममध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरू केली. यावेळी सात जणांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

NASA DART Mission : पृथ्वीवर येणाऱ्या संकटाच्या NASA नं केलं संरक्षण, पहा हा व्हिडीओ

‘आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई समोरे जा’ आशिष शेलार संतप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss