spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये मांढरदेवीची (काळूबाई) उपासना ठरते लाभदायक

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथे श्री काळेश्वरी देवी उर्फ काळूबाईचे पुरातन मंदिर आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील लाखो भाविकांची दर्शनास गर्दी असते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळूबाईची नवरात्रात यात्रा असते. काळूबाई ही देवी नवसाला पावणारी अशी भक्तांची श्रद्धा आहे. समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान पर्यटकांना आकर्षित करत आहे . तसेच वाईपासून अवघ्या वीस किमी अंतरावर काळूबाईच्या देवीचे मंदीर आहे. नवरात्री मध्ये काळूबाईचा दर्शनाला भरपूर भाविकांची गर्दी असते . आणि यात्रा देखील असते . नवरात्री उत्सवामध्ये काळूबाईचे दर्शन घेतल्यास ती प्रसन्न होते आणि घरात शांतता आणि निरोगी वातावरण असते .

हे ही वाचा : Navratri 2022 : दुर्गा मातेने अप्सरचे रूप धारण करून, केला महिषासुराचा वध

 

काळूबाई म्हणजे पार्वतीचे दुसरे रूप . मांढरदेवी येथील देवीचे नाव काळेश्वरी देवी असून काहीजण तिला काळूबाई, काळूआई अशा नावाने ओळखले जाते . तिला मांढरदेवी असेही संबोधले जाते . त्नासुर आणि लाख्यासुर हे दोन राक्षस लोकांना त्रास देत होते, आणि ऋषी मुनींच्या तपस्येत विघ्न आणत होते. या ऋषीमुनींनि शंकर देवाची आराधना होती . या दोन राक्षसांचा कोणी वध करणार नाही आणि रक्त सांडून त्यावर सूर्य किरण पडल्यास ९९ राक्षस तयार होण्याचे वरदान भगवान शंकराने त्या दोन राक्षसाना दिले होते. त्यामुळे शंकरांनी ऋषीमुनिना माता पार्वतीची आराधना करण्यास सांगितले. त्यानंतर ऋषी मुनींनी होमहवन करून मातेची आराधना केली. माता प्रसन्न होऊन होम कुंडातून उज्वल अशी मूर्ती वर आली, हीच माता काळेश्वरी. पौष पौर्णिमेच्या रात्री या दोन्ही राक्षसांचा वध या देवीने केला. यानंतर माता विश्रांतीसाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी याच मांढरदेव गडावर देवीने वास्तव्य केले अशी तिची आख्यखिका आहे .

 

तसेच काळूबाईचे पूजा आणि अर्चना कोलकाता मध्ये देखील केली जाते . नवरात्र काळात या देवीच्या मंदिरात ९ दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. नवरात्र कालावधीत हे मंदिर भाविकांसाठी अहोरात्र उघडे असते. नवरात्री मध्ये काळूबाईच्या मंदिरात जागरण गोंधळ केले जाते . नवरात्री उत्सवामध्ये काही दुर्घटना घडू नये याची विशेष काळजी घेतली जाते . नवरात्रोत्सव काळात मांढरदेव देवस्थान भाविकांनसाठी विविध सोयी सुविधा पुरवल्या जातात. नवरात्र उत्सवात ‘उदे गं अंबे उदे’ चा जागर केला जातो .

हे ही वाचा :

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कळस स्थापनेचे महत्व आणि पूजा विधी कशी करायची?, जाणून घ्या

 

Latest Posts

Don't Miss