spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

थायरॉईड हा आजार आजकाल खूप वाढताना दिसत आहे. थायरॉईडचे प्रमाण आजकाल स्त्रियांमध्ये खूप वाढताना दिसत आहे. थायरॉईड वाढण्याचे प्रमुख कारण बिगडलेली जीवनशैली. तसेच थायरॉईडचे औषध बाजारात उपलब्द आहेत किंवा तुम्ही घरगुती उपाय करून देखील तुम्ही थायरॉईड नियंत्रणात आणू शकता . थायरॉईड ही गळ्याच्या पुढील भागात असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. ह्या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या गतिविधि वर नियंत्रण ठेवणे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतरण ऊर्जेत करते. ह्या सोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही करते.

हे ही वाचा : चहा कॉफी ऐवजी प्या ही पेय आणि आठवड्याभरात मिळवा चमकदार त्वचा

 

थायरॉईडची लक्षणे –

सतत वजन वाढणे

सतत वजन कमी होणे

घसा खवखवणे

हृदयाच्या गतीमध्ये बदल होणे

मूड बदलणे

केस गळणे

मासिक पाळी असामान्य होणे

उच्च रक्तदाब

झोप न येणे

स्नायूंमध्ये दुखणे

चेहऱ्यावर सुजन येणे

कोरडी त्वचा

थकवा

 

थायरॉईड नियंत्रण मध्ये ठेवण्यासाठी उपाय –

थायरॉईड नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तुळशीचा चहा पिया किंवा तुळशीचे २ – ३ रिज पाने खाणे .

रात्री झोपण्याआधी एक चमचा अश्वगंधा चूर्ण गाईच्या दुधा सोबत घेऊ शकतात. अश्वगंधा हार्मोन्सचे असंतुलन दूर करते आणि थायरॉईड सारख्या गंभीर रोगातही उपयोगी आहे.

दररोज एक चमचा त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने ही थायरॉइड नियंत्रणात राहते .

थायरॉईड नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही आहारामध्ये काळी मिरीचा वापर करू शकता .

रोज वेळेवर जेवण होणे फार गरचेचे आहे .

जंक फूड, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड खाणे पूर्णपणे बंद करावे.

रोज नियमित पणे व्यायाम आणि योगासने करणे .

आहारामध्ये गहू आणि ज्वारी चे सेवन करावे.

धूम्रपान, अल्कोहोल आणि इतर नशील्या पदार्थां पासून दूर राहावे.

बदाम , काजू , खजूर इत्यादी ड्रायफ्रूटचा समावेश करावे .

थायरॉईडच्या रुग्णांनी नारळाचे सेवन केल्यास चयापचय क्रिया वाढेल, तसेच थायरॉइडच्या समस्येपासून सुटका मिळेल. खोबरे कच्चे, चटणी आणि लाडू बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता.

धन्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. दररोज एका ग्लास पाण्यात २ चमचे संपूर्ण धणे घाला आणि रात्रभर भिजवा. ही कोथिंबीर सकाळी पाण्यात पाच मिनिटे उकळवा आणि नंतर गाळून सेवन करा, फायदा होईल.

हे ही वाचा :

सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ? तर हि बातमी खास तुमच्यासाठी…

 

Latest Posts

Don't Miss