spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पिंपरी-चिंचवडमध्ये सेना-भाजप युती कायम राहण्याची भूमिका – खासदार बारणे

शिंदे गटाचे खासदार बारणे यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी सोबत लढणार आहोत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, असे शिंदे गटाचे उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले. पक्षबांधणी संदर्भात बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राजेश वाबळे, सरिता साने, नीलेश बारणे, विमल जगताप, नीलेश हाके, बशीर सुतार, सुनील हगवणे यावेळी उपस्थित होते.

शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करीत असल्याचे नमूद करून बारणे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे. त्यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री शिंदे वाटचाल करीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी सक्रियपणे शिंदे यांच्यासमवेत आहेत.’ आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बांधणीसाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविली जाईल, असे बारणे म्हणाले, ‘आम्ही भाजपसोबत राहणार आहोत. त्यासंदर्भातील चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली आहे. आता स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून निवडणूक रणनीती ठरवली जाईल.’

‘महाविकास आघाडीचे सरकार असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना जिल्ह्यांचे दौरे करायला सांगितले होते. त्यावेळी मी तीन जिल्ह्यांचा दौरा केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला गिळंकृत करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सविस्तर अहवाल दिला. सेना-भाजप युती कायम राहण्याची भूमिका आम्ही घेतली होती. परंतु, पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतला,’ असे बारणे यांनी सांगितले. ‘शिवसेना पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोग, न्यायालयात आहे. तो लवकरच मिटेल. मात्र, मी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच लोकसभा निवडणूक लढविणार आहे,’ असे बारणे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

बाजारातील मंदीचा गौतम अदानींना बसला फटका; श्रीमंतांच्या यादी झाला मोठा फेरबदल

जागतिक पर्यटन दिनानिमित्त काँग्रेसने उडवली पीएम मोदींची खिल्ली म्हणाले, ‘महागड्या विमानांतून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss