Thursday, September 26, 2024

Latest Posts

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी ठाकरे – शिंदेची जय्यत तयारी सुरु

दसरा मेळाव्याला (Dasara Melava) आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गट यांची जंगी तयारी सुरू केली आहे. उच्च न्यायालयात (Bombay High Court) ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे

दसरा मेळाव्याला (Dasara Melava) आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गट यांची जंगी तयारी सुरू केली आहे. उच्च न्यायालयात (Bombay High Court) ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. १९६६ सालापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळावा आज दोन गटात विभागला गेला आहे. ज्या दसरा मेळाव्याला विचारांचे सोनं लुटलं जायचं त्याच मेळाव्यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे.

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी पूर्णकडे सज्ज झाले आहेत. शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीकेसी मैदानावर देखील एक लाख कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दहा हजार गाड्यांची पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच धुळे जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्त्यांना घेऊन रेल्वेने जाण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉ. तुळशीराम गावित यांनी दिली आहे. तसेच गरज पडल्यास खाजगी वाहनांनी जाण्याचं नियोजन सुरू आहे म्हणाले. बोलेरो, किंवा क्रूझर यासारख्या गाड्यांची गरज पडल्यास तयारी करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी खाजगी बसेस आणि इतर वाहने मिळून अंदाजे ५०० गाड्यांतून कार्यकर्ते मुंबईला नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या मतदारसंघातून तीनशे ते चारशे चारचाकी गाड्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत घेऊन जाण्याचे नियोजन केलं. दसरा मेळाव्याला बीकेसी एमएमआरडीए मैदानं कार्यकर्त्यांनी भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहेत. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटात सामील झालेला शिवसैनिक या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. तर दसरा मेळाव्यासाठी हिंगोलीसाठी २०० खासगी बस जाणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी एकूण १०-११ हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हिंगोली मधून दहा ते अकरा हजार लोक जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.

हे ही वाचा :  जागतिक पर्यटन दिनानिमित्त काँग्रेसने उडवली पीएम मोदींची खिल्ली म्हणाले, ‘महागड्या विमानांतून… 

तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख देवगिल शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून चार बसेस निघणार आहेत. मुंबईत एकूण २२७ शाखा आहे म्हणजे एकूण ९०८ बस या मुंबईतल्याच असणार आहेत. मुंबईतून ठाकरेंना यंदा ५० हजारपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मुंबईत शिवसेनेचे १२ विभागप्रमुख आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला दसरा मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व विभागप्रमुखांवर शिवसेनेचे नेते काम करत आहेत. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि नाशिकमधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. मुंबईच्या बाहेरून साधारणतः ५० हजार कार्यकर्ते अपेक्षित आहेत. खासदार राजन विचारेंवर ठाण्यासह, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

रिसॉर्टमध्ये ड्रग्ज, वेश्याव्यवसाय ही सामान्य गोष्ट होती: माजी कर्मचाऱ्यांचा आरोप

कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपाराची नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss