Thursday, September 26, 2024

Latest Posts

सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला चिन्हाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सकाळपासून सुरु असलेला दोन्ही गटाचा युक्तिवाद संपला. निकाल लागल्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं म्हटलं. लोकशाहीत बहुमताला महत्व असतं, बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आमच्याकडे आहे. देशात जे काही निर्णय होतात ते कायदे, राज्यघटना यांच्याप्रमाणं होतं असतात. निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा आहे. काही निर्णय कोर्टात होतात, काही निर्णय निवडणूक आयोगात होतात. निवडणूक आयोगानं काही ऐकू नये,असं काही जणांना वाटत होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं आज निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही कुठलाही निर्णय कायद्याच्या विरोधात जाऊन घेतलेला नाही. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतला आहे त्याचा मी आदर करतो. आम्हाला ज्या निलंबनाच्या नोटिसा दिल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव प्रलंबित होता. महाविकास आघाडी सरकार मनाला वाटेल त्याप्रमाणं काम करत होतं. हे प्रकरण न्यायालयात असल्यानं आम्ही त्याबद्दल जास्त भाष्य करणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जे घटनातज्ज्ञ होते त्यांनाही असं वाटत होतं की, आमची बाजू योग्य होती. त्यामुळं शेवटी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. खरंतर सदस्यत्व रद्दबातल करण्याच्या ज्या काही नोटीसा आमदारांना दिल्या गेल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. महाविकास आघाडी सरकारनं वाट्टेल तसे निर्णय घेतले होते, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही कायद्याच्या विरोधात काही केलं नसल्याचं घटनातज्ज्ञांनी सांगितल्याची माहिती दिली. आम्ही कोणताही निर्णय कायद्याच्या विरोधात जाऊन घेतलेला नाही. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल आम्हाला विश्वास होता, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

१ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे महागणार

उद्धव ठाकरे हेच २०२३ पर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष; कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद

पृथ्वीला धोका निर्माण करणाऱ्या उल्केशी थेट टक्कर देणारे स्पेसशिप : नासाने केलेल्या चाचणीत यश..!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss